Mahatma Gandhi Tanta Mukti Yojana : तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवडीवरून ग्रामसभेत गदारोळ; अध्यक्षपद प्रलंबित

Uproar in gram sabha over Tanta Mukti Committee chairperson selection : अर्जदारांमध्ये अटीतटीचा संघर्ष, राजकीय गटबाजीचे प्रदर्शन

Chikhali चिखली तालुक्यातील मेरा खुर्द ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवडीवरून प्रचंड गदारोळ झाला. तब्बल दोन तास तणावाचे वातावरण राहिल्यानंतरही अध्यक्षपदाचा निर्णय होऊ शकला नाही, त्यामुळे ही निवड प्रलंबित ठेवण्यात आली आहे.

ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात सरपंच रमेश अवचार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसेवक सुभाष वीर यांनी विकास कामांसह विविध अजेंड्यावरील विषयांचे वाचन केले, त्यात तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवड हा महत्वाचा मुद्दा होता. इतर सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले, मात्र या निवडीवरून वाद निर्माण झाला.

Sanjay Khodke Sulbha Khodke : रेल्वे ओव्हरब्रिज बंद; आमदार दाम्पत्य पोहोचले घटनास्थळी

तंटामुक्ती समिती अध्यक्षपदासाठी सुनिल गवई, सर्जेराव गवई आणि मुक्तार शेख यांनी अर्ज दाखल केले होते. तथापि, मुक्तार शेख यांनी माघार घेतल्याने स्पर्धा दोघांमध्ये राहिली. परंतु सुनिल गवई आणि सर्जेराव गवई यांच्यात एकमत होऊ शकले नाही. ग्रामसभेत वाद तीव्र झाला आणि पोलिसांना पाचारण करावे लागले. काही ग्रामस्थांनी तंटामुक्ती समिती बरखास्त करण्याची मागणी केली, तर गटबाजीमुळे वातावरण तापले.

या निवडीदरम्यान ग्रामपातळीवरील राजकीय गटबाजी स्पष्टपणे दिसून आली. दोन्ही उमेदवारांना वेगवेगळ्या गटांचा पाठिंबा असल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे तणाव कमी झाला, परंतु अध्यक्षपदाची निवड होऊ शकली नाही.

Harish Pimple : उमा बॅरेज प्रकल्पात तब्बल २७ कोटींचा घोटाळा?, आमदार हरीष पिंपळे यांचा गंभीर आरोप

आता पुढील ग्रामसभेत हा विषय पुन्हा चर्चेत येणार आहे. या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात तापमान वाढले असून गटबाजी आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते.