Congress state president Harshvardhan Sapkal said that we are with Shiv Sena in the fight to save Maharashtra’s religion : भाजपच्या विरोधात लढण्यासाठी जे पक्ष येतील, त्यांच्यासोबत काँग्रेस
Mumbai : प्रबोधनकार ठाकरे यांनी महाराष्ट्र धर्म कसा असला पाहिजे, हे सांगितले आहे. ‘देवांचा धर्म आणि धर्माची देवळे’ या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष आज धर्म बुडवायला निघाला आहे. भाजप लोकशाही व संविधान विरोधी आहे. शिव – शाहू – फुले – आंबेडकरांचा महाराष्ट्र वाचवण्याच्या लढ्यात आम्ही शिवसेनेच्या सोबत आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज (१६) त्यांच्या मातोश्री निवासस्थानी हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजप महाराष्ट्र धर्म बुडवायला निघाला आहे. संविधान व लोकशाही व्यवस्थेला भाजप संपवत आहे. महाराष्ट्र धर्माचे रक्षण करण्याचे काम महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी करत आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबतची आजची भेट ही शिष्टाचार भेट होती. या भेटीत विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीतही चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेसने स्थानिक नेतृत्वाला आघाडी करण्याचे अधिकार दिले आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांना दिली. या निवडणुकीची अधिसुचना निघाल्यावर मित्र पक्ष एकत्र बसून निर्णय घेणार आहेत, असे सपकाळ यांनी सांगितले.
Shiv Sena : कारकर दाम्पत्य शिवसेनेत, उबाठाला आणखी एक धक्का !
लोणार सरोवराची फोटोग्राफी असलेले एक पुस्तक, बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्राचे फटकारे व पंढरपूरच्या वारीची फोटोग्राफी असलेले पुस्तक उद्धव ठाकरे यांनी मला भेट दिले. तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरील एक पुस्तक मी त्यांना भेट दिले, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.