Electricity bill amount pending with government offices only : १ करोड ४० लाख रुपयांची थकबाकी कशी वसूल करणार?
Wardha एखाद्या व्यक्तीचे एक महिन्याचे बिल थकले तरी त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची ताकीद महावितरणाचा कर्मचारी देऊन जातो. परंतु तेच वीजबिल सरकारी कार्यालयाचे थकले तर महावितरणचा कर्मचारी मावळ भूमिका का घेत असतो. असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वर्धा जिल्ह्यातील अद्यापही सरकारी कार्यालयातील १ करोड ४० लाख थकीत बिल बाकी आहे. तर ग्राहकाकडे ६ करोड ९७ लाख थकीत बिल बाकी आहे. महावितरणकडून हे बिल मार्चपर्यंत पूर्ण वसूल होईल, असे सांगण्यात येत आहे. महावितरण ही इतर कंपन्यांकडून वीज खरेदी करीत असते. त्याचे पैसे नगदी स्वरूपात द्यावे लागतात.
वीजपुरवठा संयंत्राची देखभाल करण्यासाठी महावितणला लाखो कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ लागतो. त्याचे वेतन महिन्याला द्यावेच लागते. दुसरीकडे महावितरण आपल्या ग्राहकांना वीज उधार देतो. काही ग्राहक नियमितपणे वीजबिल भरतात. तर काही ग्राहक वीजबिल भरण्यास टाळाटाळ करीत असतात. तसेच काही सरकारी कार्यालयाचे वीजबिल अनेक महिने भरले जात नाही. त्यामुळे महावितरणची अडचण वाढते.
शासकीय कार्यालयाचे वीजबिल भरण्यासाठी शासनाकडून निधी दिला जातो. मात्र, निधी उपलब्ध होण्यास कधीकधी विलंब होतो. अशावेळी वीजबिल थकीत असते. जास्तीत जास्त वीजबिलाची वसुली व्हावी, यासाठी वरिष्ठ आधिकाऱ्यांचा दबाव असतो. कंपनीच्या दृष्टीने ते आवश्यकसुद्धा आहे. कंपनीचे कर्मचारी वीज दुरुस्तीची जबाबदारी पार पाडण्याबरोबरच वसुलीकडेही लक्ष देत असतात.
Education Board aler on sensitive centres : कॉपी करणाऱ्यांवर ड्रोनची नजर!
शासकीय कार्यालयांकडे वीजबिलाची १ करोड ४० लाखांची थकबाकी आहे. काही कार्यालये मात्र नियमित वीजबिल भरणा करीत असतात. आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यात विजेचा वापर अधिक होत असल्यामुळे ग्रामीण भागात वीजचोरीचे प्रमाण वाढते. याचा मोठा फटका महावितरणला बसतो.








