Two arrested for setting fire to power distribution center : निष्काळजीचा कडेलोट; अभियंत्यावरही पेट्रोल फेकले
Amravati “आमच्याकडे वीज राहत नाही. तुम्ही कार्यालयात बसून नेमके काम काय करता? आता तुमचे कार्यालयच पेटवतो,” असं म्हणत दोन जणांनी वलगाव येथील महावितरणच्या वीज वितरण केंद्रातील टेबलावर पेट्रोल ओतून आग लावली. एवढेच नव्हे, घटनेचा व्हिडिओ मोबाईलवर शूट करणाऱ्या अभियंत्यावर त्यांनी पेट्रोल ओतण्याचा प्रयत्न केला. मात्र अभियंत्याने वेळेत बाहेर पळ काढला. ही धक्कादायक घटना वलगाव येथे घडली. याप्रकरणी वलगाव पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
अविनाश गोवर्धन निर्मळ (३३) आणि विनीत दिलीप तायडे (३३), दोघेही वलगांवचे रहिवासी असलेल्या आरोपींची नावे आहेत. वलगाव केंद्राचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या कनिष्ठ अभियंता गोपाल विनायक इंगळे यांनी दिलेल्या पोलिस तक्रारीनुसार, अभियंता इंगळे व त्यांचे सहकारी रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास कार्यालयात असताना अविनाश व विनीत तिथे आले.
Uddhav Thackeray: चिंधीचोर मिंधे स्वतःला मोदींचा घरगडी म्हणतो…
त्यांनी अधिकाऱ्यांना म्हटले, “तुमच्याकडे वीज राहत नाही. तुम्ही इथे बसून काम करत आहात तरी नेमके करता तरी काय? आता आम्ही तुमचे कार्यालयच पेटवतो.” असं म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली व बॉटलमधील पेट्रोल टेबलावर ओतायला सुरुवात केली. या घटनेत कार्यालयातील दोन टेबलांवरील महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत.
Shirdi Crime News : 7 अल्पवयीनांचा प्रताप, पार्टीच्या पैशासाठी एकाला खून करून लुटले !
“काही नागरिक निवेदन घेऊन आले असताना ही घटना घडली. त्यांनी वीजपुरवठ्याचा प्रश्न मांडला असता आम्ही त्यासंदर्भातील कारवाईचे आश्वासन दिले. त्याचवेळेवर अविनाश व विनीत यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी टेबलावर पेट्रोल ओतला व आग लावत असतानाच माझ्या अंगावरही पेट्रोल टाकला. मात्र त्यावेळेस आम्ही बाहेर पळू शकलो असल्यानं मोठा अनर्थ टळला.” असं गोपाल इंगळे यांनी घडलेल्या प्रकाराचा आढावा दिला. या घटनेनंतर वलगाव पोलिसांनी अविनाश निर्मळ व विनीत तायडे या दोघांनाही अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.