Breaking

Mahayuti : कार्यकर्त्यांच्या मनात ‘घड्याळ’, सिंदखेडराजात भाजपची पडझड?

BJP leaders, party workers joining Ajit Pawar’s NCP : महायुतीतच पक्षांतर; जुने पदाधिकारी वळताहेत अजितदादांच्या दिशेने

Buldhana गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असूनही भारतीय जनता पक्षाला सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात मरगळ आली आहे. पक्षांतर्गत विसंवाद, निष्क्रिय संघटनात्मक कामकाज आणि नेतृत्वाचा अभाव यामुळे भाजपचे अनेक जुने कार्यकर्ते आणि पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिशेने वळताना दिसत आहेत.

पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार, प्रवक्ते, डॉक्टर आणि वकील या सारख्या अनुभवी व युवा चेहऱ्यांची भरपूर उपस्थिती असूनही पक्षात सध्या गोंधळाचे वातावरण आहे. काही कार्यकर्त्यांनी थेट राष्ट्रवादी आमदार मनोज कायंदे यांची साथ धरल्याची चर्चा आहे. ‘हातावर घड्याळ’ बांधण्याची तयारी अनेकांनी सुरू केली असल्याचेही वृत्त आहे.

Local Body Elections : शह-काटशहाच्या राजकारणाने तापलं वातावरण; भाजपची ‘मौन’ खेळी!

पिछल्या विधानसभा निवडणुकीत भाजपमधील एका गटाने शिवसेनेचे, तर दुसऱ्या गटाने राष्ट्रवादीचे उमेदवार समर्थन केल्याचे बोलले जाते. त्यामुळे पक्षाची एकसंधता खिळखिळी झाली. दुसरीकडे, नंदाताई व देवानंद कायंदे यांच्या पायाभूत प्रयत्नांमुळे मनोज कायंदे यांचा पक्ष मतदारसंघात मजबुतीने उभा राहिला.

पूर्वी व्याख्याने, निवासी शिबिरे, चिंतन बैठकांमधून पक्षाचा पाया मजबूत केला जात होता. पण सध्या पक्षाची अंतर्गत शिस्त ढासळली असून तालुकाध्यक्षांच्या सभेतच बाचाबाची आणि आरोप-प्रत्यारोप झाले. सहनिरीक्षकाच्या उपस्थितीतच पक्षाची इभ्रत वेशीवर टांगण्यात आली, ही बाब पक्षश्रेष्ठींना विचार करायला लावणारी आहे.

Buldhana Panchayat Samiti : रोकडिया नगर शहरात, पण तालुक्याचे गण गेले कुठे?

भाजपने राज्यात रवींद्र चव्हाण आणि जिल्ह्यात विजयराज शिंदे यांच्याकडे नेतृत्व दिले असले तरी सिंदखेडराजा मतदारसंघात नेतृत्वाचा शून्यपणा जाणवतो. गटबाजी, कार्यकर्त्यांतील नाराजी, आणि विरोधी पक्षांतील आमदारांचे सक्रिय काम पाहता, भाजपला याठिकाणी मोठा राजकीय धक्का बसू शकतो.