Breaking

Mahayuti : महायुतीत पक्षबदल सुरूच; बुलढाण्यात शिंदेसेनेचा भाजपला धक्का!

Former soldier Vasant Mirage joins Eknath Shinde Shiv Sena : माजी सैनिक वसंत मिरगे यांचा शिवसेनेत प्रवेश; भाजपच्या गडात गायकवाड यांना मोठे बळ

Buldhana भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत उत्तमराव मिरगे यांचे पुत्र आणि सैनिकी सेवेत देशासाठी योगदान दिलेले माजी सैनिक वसंत मिरगे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे आ. संजय कुटे यांच्या मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

वसंत मिरगे यांच्या नेतृत्वात शेकडो युवक कार्यकर्ते देखील शिवसेनेत दाखल झाले. त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय, बुलढाणा येथे करण्यात आले होते. खासदार व केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.

Vijay Ghadge : अजित पवारांची भेट घेतली विजय घाडगे यांनी उपस्थित केले प्रश्न

वसंत मिरगे यांनी आपल्या पक्षप्रवेशाच्या वेळी भावना व्यक्त करताना सांगितले, “आ. संजय गायकवाड यांचे काम, बोलण्यातला आत्मविश्वास, आणि युवकांप्रती असलेली आत्मीयता पाहूनच मी हा निर्णय घेतला आहे. सैनिकी सेवेनंतर आता जनसेवा हेच माझे ध्येय आहे.”

या वेळी आमदार संजय गायकवाड यांनी स्वागत करत स्पष्ट केले की, “शिवसेना ही सामान्य जनतेच्या हक्कांसाठी लढणारी चळवळ आहे. प्रवेश करणाऱ्यांनी केवळ नावापुरते शिवसैनिक न राहता विचारांनी बांधिलकी ठेवावी. हा प्रवेश नाही, तर सामाजिक परिवर्तनासाठी घेतलेली एक जबाबदारी आहे.”

Vidarbha Farmers : हुमणी अळीने सोयाबीन उध्वस्त, शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

या पक्षप्रवेश सोहळ्याला महाराष्ट्र राज्य युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय संजय गायकवाड, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख अशोक टावरी, तालुकाप्रमुख अजय पारस्कर, महिला आघाडी पदाधिकारी, शिवसैनिक व वसंत मिरगे यांचे मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.