Construction of 27 new and renovation of 34 Anganwadis : २७ नव्या अंगणवाड्यांची होणार निर्मिती; बांधकामासह दुरुस्तीवरही भर
Wardha लहान मुलांना कोवळ्या वयात शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य अंगणवाडीच्या माध्यमातून होत असते. पण दुर्दैवाने शिक्षणाचं बाळकडू देणाऱ्या अंगणवाड्यांचीच अवस्था वाईट आहे. मात्र आता वर्धा जिल्ह्यातील ३४ जुन्या अंगणवाड्यांची डागडुजी होऊन त्यांचं रुपडं पालटणार आहे. त्याचवेळी २७ नव्या अंगणवाड्यांचंही बांधकाम होणार आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक सोयीसुविधा अंगणवाड्यांमध्ये निर्माण केल्या जाणार आहेत.
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी या कामांसाठी भरीव आर्थिक तरतूत करवून घेतली आहे. महिला व बालविकास विभागांतर्गत अंगणवाडी विकासासाठी २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणमधून ४ कोटी ५ लाख रुपयांची तरतूद भोयर यांनी केली होती. मात्र अंगणवाड्यांची संख्या व सुविधांची गरज लक्षात घेता त्यात नव्याने भरीव वाढ करण्यात आली आहे. अतिरिक्त ३ कोटी १० लाखांचा निधी यासाठी उपलब्ध करून दिला आहे.
Nitin Gadkari : इथे असावा प्रेम-जिव्हाळा, नकोत नुसती नाती ! गडकरींनी ऐकवली कविता..
२०२४-२५ या आर्थिक वर्षात आंगणवाडीसाठी एकूण ७ कोटी १५ रुपयांची तरतूद झाली आहे. जिल्ह्याच्या इतिहासात अंगणवाडी बांधकामासाठी प्रथमच मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी दरवर्षी १० ते १२ नवीन अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात येत होते. मात्र, यावर्षी २७ नवीन अंगणवाड्यांची निर्मिती होणार आहे. सोबतच जुन्या केंद्राची डागडुजी देखील करण्यात येणार आहे.
MLA Ravi Rana : नव्या एसटी बसच्या स्वागतासाठी आमदारच बनले चालक!
प्रथम टप्प्यात मंजूर झालेल्या निधीतून १६ नवीन अंगणवाड्यांचे बांधकाम आणि ३४ अंगणवाड्यांची दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. परंतु जिल्ह्याची गरज ओळखून अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिल्याने आणखी ११ नवीन अंगणवाड्यांच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्ह्यातील अंगणवाडीला संरक्षण भिंत नसल्याने बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झाला होता. भविष्याचा वेध घेवून जिल्ह्यात प्रथमच २३ अंगणवाड्यांना संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. यामुळे अंगणवाडीतील बालकांची सुरक्षा अधिक सुनिश्चित होणार आहे. २०२४-२०२५ मध्ये अंगणवाड्यांसाठी एकूण ७ कोटी १५ लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे.








