Development works on Deekshabhoomi stopped : बौध्द-आंबेडकरी जनतेचा सवाल; सरकारच्या भूमिकेवर संताप
Nagpur दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगच्या विरोधात बौद्ध-आंबेडकरी समाजाने पुकारलेल्या तीव्र आंदोलनानंतर सरकारने भूमिगत पार्किंग रद्द केली. परंतु त्या आंदोलनानंतर दीक्षाभूमीवरील एकूणच विकासकामे बंद पडली आहेत. ती बंद पडलेली अर्धवट कामे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी बौद्ध-आंबेडकरी समाजाकडून करण्यात आली आहे.
दीक्षाभूमीच्या जागतिक स्तरावर विकास करण्याच्या उद्देशाने शासनाने नवीन विकास आराखडा तयार केला होता. दोनशे कोटी रुपयांचा हा विकास आराखडा होता. या विकास आराखड्यानुसार कामाला सुरुवात झाली होती. या कामामध्ये भूमिगत पार्किंगही करण्यात येणार होती. परंतु भूमिगत पार्किंगमुळे दीक्षाभूमीवरील स्मारकाला आणि बोधिवृक्षाला धोका निर्माण होईल. या उद्देशाने या भूमिगत पार्किंगला बौद्ध-आंबेडकरी समाजाकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला.
आंबेडकरी समाजाच्या यासंदर्भात तीव्र भावना होत्या. त्यांनी मोठे आंदोलन करीत भूमिगत पार्किंगचे कामही बंद पाडले. सरकारनेही समाजाची भावना विचारात घेऊन भूमिगत पार्किंग रद्द केली. काम बंद झाले. भूमिगत पार्किंगमुळे करण्यात आलेला मोठा खड्डाही बुजवण्यात आला. आता दीक्षाभूमीवरील संपूर्ण जागा समतल झाली आहे. परंतु तेव्हापासून दीक्षाभूमीवरील एकूणच विकासकामे बंद पडली आहेत.
दीक्षाभूमीवरील अर्धवट राहिलेली कामे आणि विकास आराखड्यातील इतर कामे तातडीने सुरू करावी, अशी मागणी आंबेडकरी समाजाकडून केली जात आहे. दीक्षाभूमीचा विकास आराखडा जवळपास २१४ कोटींचा होता. त्यातील ४० कोटी रुपयांचा पहिला हप्ता माजी समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांच्या काळातच देण्यात आला. त्यानंतर पुन्हा ७० कोटी रूपये शासनाने दिले. असे एकूण ११० कोटी रूपये शासनाने दिले आहेत.
DCM Eknath Shinde : गोळीचा जवाब तोफेने देणारा भारत आता नवभारत आहे
कामाला सुरुवात झाली, त्यानंतर काम बंद पडले. यापैकी काही निधी खर्च झाला असेल मोठा निधी अजूनही शिल्लक आहे. काम जस-जसे होईल तसा इतर निधीही मिळत जाईल.