Breaking

Mahayuti Government : मेहकरमधील बेरोजगारांसाठी धावून आला ‘रोजगार मेळावा’!

Employment fair to be held at Mehkar : एमईएस कला व वाणिज्य महाविद्यालयात गुरुवारी आयाेजन

Buldhana ग्रामीण भागात उद्योग येतात, पण स्थानिकांना रोजगार देत नाहीत. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रात बेरोजगारी सातत्याने वाढत आहे, अशी ओरड होत असते. मात्र आता मेहकर तालुक्यातील बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा धावून आला आहे. आज, गुरुवार, दि. १६ जानेवारीला या मेळाव्याचे आयोजन होणार आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शक केंद्र यांच्यावतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मॉडेल करिअर सेंटर व एमईएस कला व वाणिज्य महाविद्यालय मेहकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार नोंदणीकृत उमेदवारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हावी. यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

Local body elections: मुदतवाढीची शक्यता मावळली, विद्यमान सदस्य निरोप घेण्याच्या तयारीत

या मेळाव्यामध्ये बुलढाणा अर्बन मल्टिस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटी, सह्योग मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटी, क्रेडिट अॅक्सेस ग्रामीण कूटा यासारख्या सहापेक्षा अधिक नामांकित उद्योजकांनी सहभाग घेतला आहे. त्यांच्याकडील 370 पेक्षा अधिक रिक्त पदे अधिसुचित केलेली आहे. या मेळाव्याद्वारे नामांकित कंपनीच्या प्रतिनिधींद्वारे तरुणांच्या मुलाखती घेतल्या जातील. तसेच योग्य उमेदवाराची प्राथमिक निवड देखील करण्यात येईल.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या व श्रम आणि रोजगार मंत्रालय भारत सरकार अंतर्गत मॉडेल करीयर सेंटरच्या या संकेतस्थळावर नाव नोंदणी करायची आहे. दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर पुरुष महिला उमेदवारांनी थेट मेळाव्यात यायचे आहे. एमईएस कला व वाणिज्य महाविद्यालय, राम नगर बस स्टँडच्या मागे, मेहकर येथे प्रत्यक्ष उपस्थित राहुन रोजगाराच्या संधीचा लाभ घेता येणार आहे, असे कळविण्यात आले आहे.

DCM Ajit Pawar : आनंदवनासाठी धावून आले अजित पवार !

या रोजगार मेळाव्यात पात्र, गरजू व नौकरी इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवार सहभागी होऊ शकतील. तसेच आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदांकरीता सुध्दा अर्ज करु शकतात. आवश्यक कागदपत्रांसह स्वखर्चाने रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहावे. आपली नाव नोंदणी करावी.