Fake schemes on social media with tne name of government : फसवणुकीसाठी शासनाच्या योजनांचा आधार; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन
Akola ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नाही. मात्र समाजमाध्यमांवर अशा नावाने फसवणुकीचे संदेश प्रसारित होत आहेत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. फसवणुकीला बळी पडू नये. असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले आहे.
समाजमाध्यमांवर फिरत असलेल्या फसव्या संदेशांमध्ये असे म्हटले आहे की, “१ मार्च २०२० नंतर दोन्ही पालक किंवा एक पालक मृत झाल्यास, आणि बालकांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्यास, अशा कुटुंबातील दोन मुलांना ‘बाल सेवा योजने’तून दरमहा ४,००० रुपये मिळतील. त्यासाठी तहसील कार्यालयात फॉर्म उपलब्ध असून, अर्ज जिल्हा बाल संरक्षण कक्ष/जिल्हा परिवीक्षा अधिकारी यांच्याकडे सादर करावा.” मात्र, महिला व बालविकास विभागाकडून ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ नावाने कोणतीही योजना अस्तित्वात नाही.
Harshawardhan Sapkal : धार्मिक विष कालवणाऱ्या नितेश राणेंना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे का?
अशा खोट्या संदेशांवर विश्वास ठेवू नका. सरकारी योजनांची अधिकृत माहिती मिळवण्यासाठी अधिकृत कार्यालयांशी संपर्क साधा. कोणालाही आर्थिक माहिती किंवा कागदपत्रे देण्यापूर्वी खातरजमा करा. फसव्या संदेशांची तक्रार नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर विभागाकडे करा. योजनांबाबत अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Ajit Pawar : देशातील ७० टक्के पनीर कृत्रीम, अजित दादा म्हणाले..
अनाथ किंवा एकल पालक असलेल्या बालकांसाठी महिला व बाल विकास विभागाकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. या योजनांची अधिकृत माहिती मिळवण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, पहिला मजला, कोषागार इमारत, जिल्हाधिकारी आवार, अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.