Now all that remains is to give the ministry to Adani, alleges Harshvardhan महाराष्ट्राला मिळणार फक्त भोपळा
Mumbai : मुंबईचे दोन्ही विमानतळ, धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली डंपिंग ग्राऊंडची जमीन, कुर्ल्यातील मदर डेअरीची ८.५ हेक्टर जमीन, वांद्र्यातील एमएेआरडीसीच्या कार्यालयाची जागाही अदानीला देऊन टाकली आहे. आता फक्त मंत्रालय, प्रशासकीय इमारत आणि विधिमंडळच अदानीला देण्याचे बाकी आहे, ते कधी देणार आहात, असा खोचक प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
टिळक भवन येथे आज (ता. ४ जून) आयोजित पत्रकार परिषदेत सपकाळ बोलत होते. ते म्हणाले, अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्याला मदत करण्यासाठी भाजप महायुती सरकारकडे पैसे नाहीत. लाडकी बहीण योजनेतून बहीणींना देण्यासाठी पैसे नाहीत, शेतकरी कर्जमाफी देण्यासाठी पैसे नाहीत. परंतु अदानीला देण्यासाठी मात्र भाजप महायुती सरकार तत्पर आहे. येवढं सर्व अदानीच्या पदरात टाकून महाराष्ट्राला मिळणार काय, तर फक्त भोपळा. मदर डेअरीची जमीन अदानीला देण्याचा निर्णय रद्द करावा.
Harshwardhan Sapkal : दलित, मुस्लीम किंवा महिला सरसंघचालक का नाही?
गृहविभागाने काढलेल्या परिपत्रकावर बोलताना सपकाळ म्हणाले की, भाजपा युती सरकार राज्यात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणारे मुद्दे उकरून काढत असते. आता या सरकाच्या गृविभागाने राज्यातील मंदिर, मशिदी, गुरुद्वारा, चर्च अशा सर्व प्रार्थनास्थळांवरील लाऊडस्पिकरसाठी एक फतवा जारी केला आहे. प्रार्थनास्थळावरील भोंग्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश घालून दिलेले असताना राज्य सरकारने वेगळा फतवा काढून आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे, हा फतवा मागे घ्यावा, अशी मागणीही सपकाळ यांनी केली आहे.
Harshawardhan Sapkal : संविधान घेऊन ऐतिहासिक काळाराम मंदिरात सपकाळांचा प्रवेश !
राज्यात अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड मोठे नुकसान केले आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते लवकरच शेताच्या बांधावर जाऊन या नुकसानीची पाहणी करणार आहेत व या पाहणीनंतर राज्यपाल महोदयांना भेटून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात विनंती करणार असल्याचेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितले.
Harshawardhan Sapkal : ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर केंद्राकडून विशेष पॅकेज आणा!
यावेळी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना प्रदेश कार्याध्यक्ष, CWC सदस्य नसीम खान म्हणाले की, भाजपा युती सरकारने भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भोंग्याचा फतवा कढला आहे. धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पिकर बाबत सुप्रीम कोर्टाचे निर्देश असतानाही गृहविभागाने अशा पद्धतीने फतवा काढणे निषेधार्ह आहे. सरकारने हा आदेश तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी नसीम खान यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेला प्रदेश कार्याध्यक्ष, CWC सदस्य नसीम खान, प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील उपस्थित होते.








