Orange ration card holders are deprived of food grains : शिधापत्रिका केवळ कागदोपत्री राहिली; सर्वसामान्यांमध्ये संताप
Lonar वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या गरजू नागरिकांना दिले जाणारे केशरी रेशनकार्ड केवळ नावालाच आहे. या कार्डधारकांना शासनाकडून स्वस्त धान्य मिळत नाही, ही वस्तुस्थिती वाढत्या महागाईच्या काळात गरीब कुटुंबांना थेट अन्नवंचित करत आहे.
शहरातील सुमारे ७५ हजार कुटुंबं केशरी कार्डधारक असूनही, त्यांना कोणतेही धान्य मिळत नसल्यामुळे शासनाच्या रेशन वितरण व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. सध्या प्राधान्य कुटुंब (पीएचएच) आणि अंत्योदय अन्न योजना (एएवाय) योजनेतील कार्डधारकांना मोफत गहू-तांदूळ आणि साखर मिळत असताना, एनपीएच (केशरी कार्डधारक) मात्र उपेक्षित राहिले आहेत.
Ex-MLA Virendra Jagtap : माजी आमदाराची अरेरावी; असंवैधानिक भाषेच्या वापराचा निषेध
२०१२-१३ पर्यंत या कार्डधारकांना ७.२० रुपये किलोने गहू आणि ९.८० रुपये किलोने तांदूळ मिळत होता. परंतु शिधापत्रिकेवर धान्य घेत नसल्याचा दावा करून ही योजना अचानक बंद करण्यात आली. २०२० मध्ये केवळ दोन महिन्यांसाठी काही प्रमाणात धान्य देण्यात आले, त्यानंतर ही सुविधा पुन्हा बंद झाली.
राजकीय व सामाजिक स्तरावर अनेक वेळा पाठपुरावा करूनही केशरी कार्डधारकांची अडचण कायम आहे. ५९ हजार ते १ लाख रुपये उत्पन्न गटातील नागरिक न धान्य योजनेस पात्र ठरतात, न इतर योजना त्यांना लाभ देतात.
Local Body Elections : अकोला जिल्ह्यात ५३१ सरपंचपदांची नव्याने आरक्षण सोडत
या परिस्थितीत शासनाकडून योजनांचा फेरआढावा घेऊन खऱ्या गरजू नागरिकांपर्यंत स्वस्त धान्य पोहोचवण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्यथा लाखो कुटुंबांच्या अन्नहक्कावर गदा येणार असून, केशरी कार्ड ही केवळ ‘दाखवायची वस्तू’ राहणार आहे, असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.