Political parties are opposing smart electric meters : वीज वितरण कंपनीला शिवसेना ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा
Amravati महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम राबविली जात आहे. त्याला राजकीय पक्षांकडून विरोध होत आहे. ही मोहीम थांबवली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना स्मार्ट मीटर परवडणारे नाही. मीटर बसवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवू. अशा इशारा देत अण्णा खंडेश्वर येथे मोर्चा काढण्यात आला होता.
शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्राहक आणि महिलांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. वीज वितरण कंपनीकडून “फॉल्टी मीटर” असल्याचे कारण देत जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम राबवली जात आहे. हे मीटर कंपनीकडून मोफत बसविले जात असल्याचा भ्रम ग्राहकांना दिला जात आहे. मात्र प्रत्यक्षात या मीटरची किंमत वीजदर वाढवून पुढील बिलांमध्ये वसूल केली जाणार आहे.
Tukaram Bidkar : एक कर्तृत्ववान शिक्षक, अभिनेता आणि जमिनीशी जुळलेला नेता!
स्मार्ट मीटर हे गरीब नागरिकांना परवडणारे नाहीत. यामुळे “आधी पैसे भरा, मग वीज वापरा” अशी नवी प्रक्रिया लागू होणार आहे. सर्व व्यवहार मोबाईल आणि बँक खात्याद्वारे करावे लागणार असल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम तात्काळ बंद करावी, अन्यथा मीटर बसवण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवले जाईल, असा इशारा प्रकाश मारोटकर यांनी दिला.
Encroachment at Mahagaon removed : बेघर कुटुंबांनी स्मशानात काढली रात्र!
यावेळी माजी नगरसेवक निलेश इखार, वासुदेवराव लोखंडे, माजी उपसभापती रेखाताई नागोलकर, सुनील गुरमुळे, महादेव सोनवणे, चेतन डकरे, नितीन दुधे, सुमित लोमटे, गुणवंत चांदुरकर, पवन डोफे, गजानन कोळमकर, रवी ठाकूर, प्रकाश ब्राह्मणवाडे, निलेश कुकडे, निलेश इंगोले, प्रेम हिवराळे, अक्षय हिवराळे, अनिकेत गटुले, निलेश मारोटकर, श्याम झिमटे, भूमेश्वर गोरे, संजय डोक, शुभम रावेकर, अतुल खंडाते, नामदेव शिरभाते, लीलाधर चौधरी, नीरज लोमटे, चेतन पुंड, कृष्णा सपकाळ, गजानन लोमटे, निलेश हळदे, अक्षय नागोलकर, अनिता भंडारे, वनिता काळबांडे, शशिकला आमडारे, शारदा सोनोने, मीना सोनवणे आदी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.








