RO machine shut down in District Women’s Hospital : पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव; आमदार निधी जातो कुठे?
Akola जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला येथे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. सध्या उन्हाचा कडाका वाढलेला असताना, पाण्याची वानवा ही गंभीर समस्या बनली आहे. रुग्णालयात चार आरओ मशीन आहेत, त्यापैकी दोन बंद आहेत. तर उर्वरित दोन आरओमध्येही नियमित पाणी उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आहेत.
आमदार अमोल मिटकरी MLA Amol Mitkari यांनी दिलेले आर ओ मशिन कोणत्याही उपयोगात आणली जात नसल्याने ती धुळ खात पडली आहे. त्यामुळे आमदार निधी खर्च करीत असूनही त्याचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे. सर्वसामान्य रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक बाहेरून दररोज २ रुपये प्रति लिटर दराने पाणी विकत घेत आहेत. रुग्णालयाच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची टाकी आहे, मात्र त्यामध्येही पाणी उपलब्ध नाही.
Akola Ram Navami Celebration : रामनवमीच्या शोभायात्रेत राजकीय शक्तिप्रदर्शन!
ही परिस्थिती धक्कादायक आहे. रुग्णालय प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. या समस्येच्या पार्श्वभूमीवर आणखी एक गोष्ट लक्षवेधी ठरत आहे ती म्हणजे, आमदार अमोल मिटकरी यांनी निधीमधून रुग्णालयासाठी एक स्वतंत्र आरओ मशीन दिले होते. हे मशीन रुग्णांना मोफत आणि थंड पाणी देण्यासाठी उभारण्यात आले होते. मात्र, हे मशीन सध्या निष्क्रिय अवस्थेत असून, धूळ खात पडून आहे.
Maharashtra Medical Council : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची आज निवडणूक
रुग्णालयात अकोलासह इतर जिल्ह्यांतूनही रुग्ण उपचारासाठी येत असतात. सध्या शहराचे तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. या उष्म्यात पाणी मिळणे अत्यावश्यक असताना, रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष धक्कादायक आहे. काही सामाजिक संस्था जेवणाची सोय करत असल्या तरी, पाणी विकत घ्यावे लागत असल्यामुळे नातेवाइकांवर आर्थिक बोजा पडत आहे.
याप्रकरणी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सर्व आरओ मशीन कार्यरत असल्याचा दावा केला. मात्र, प्रत्यक्षात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र आहे.








