Breaking

Mahayuti Government : नातेवाईक त्रास देतात, इच्छापत्राचे काय करू?

 

Senior citizens are raising complaints on the helpline : ज्येष्ठ नागरिक मांडत आहेत हेल्पलाईनवर कैफियत

Wardha ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या १४५६७ या टोल फ्री क्रमांकाच्या हेल्पलाइनवर जिल्ह्यातून वर्षभरात हजारो ज्येष्ठ नागरिकांनी कॉल करून तक्रारींसह मदतीसाठीही हाक दिली. कुणी कुटुंबात होणार हेळसांड सांगतात. तर कुणी इच्छापत्रासाठी नातेवाईकांकडून होणारा त्रास सांगतात आणि सल्ला मागतात. ज्येष्ठांचे प्रश्न सुटत नाहीत, असं म्हटलं जातं. पण हेल्पलाईनमुळे किमान ज्येष्ठ स्वतः कुटुंबातील अन्यायाबद्दल बोलू लागले आहेत, हे जास्त महत्त्वाचे आहे.

सूनेकडून दैनंदिन होणारा त्रास, मुले वागवत नसल्याच्या तक्रारींसह कौटुंबिक त्रासाबाबतच्या बहुतांश तक्रारींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे त्यांचे हक्क, कायदे, भावनिक आधारासह इच्छापत्र, मालमत्तेच्या वादाबाबत मार्गदर्शन घेण्यासाठीही या हेल्पलाइनवर ज्येष्ठ नागरिकांनी संपर्क साधला आहे.

Ladki Bahin Scheme : नियम कठोर झाले, पण बहिणी आत्मनिर्भर झाल्या!

ज्येष्ठांना त्यांच्या कुटुंबातील त्रासांची खूप मोठी समस्या आहे. हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारींमध्ये, ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की, त्यांना सून खाऊ घालत नाही आणि मुलगादेखील त्यांची देखभाल करत नाही. अनेक वृद्ध लोकांची अशीच स्थिती असून, ते या परिस्थितीत असाहाय्य होऊन कौटुंबिक आणि वैयक्तिक त्रास सहन करत आहेत.

शासनाने जारी केलेल्या १४५६७ या हेल्पलाइनवर वर्षभरात हजारो ज्येष्ठ नागरिकांनी कॉल केले आहेत. त्यात तक्रारींसह मदत व मार्गदर्शन मिळण्यासाठीच्या कॉल्सचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांनी कुटुंब व समाजातून होत असलेला शारीरिक, मानसिक त्रास, आर्थिक छळवणुकीबाबत तक्रारी केल्या आहेत. पत्नी सोडून गेल्यानंतर आलेला एकटेपणात भावनिक आधारही मागितला.

School Education Minister Dada Bhuse : पडघम वरती टिपरी पडली तडम तडतड तडम् !

नातेवाईक त्रास देत असल्याने इच्छापत्राबाबतही कायदेशीर सल्ला कॉलवर घेतला. त्याचप्रमाणे त्यांचे हक्क, कायदे, योजना व मिळणाऱ्या आधाराबाबतही माहिती त्यांनी या हेल्पलाइनकडे विचारली. ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारने १४५६७ हा हेल्पलाइन क्रमांक सुरू केलेला आहे. या हेल्पलाइनवर कॉल करून ज्येष्ठ नागरिकांना चार प्रकारची मदत मिळते.

ज्येष्ठ नागरिकांना या हेल्पलाइनकडून माहिती, मार्गदर्शन, भावनिक आधार व क्षेत्रीय पातळीवर मदत या चार प्रकारच्या सेवा दिल्या जातात. त्यात जवळचे हॉस्पिटल, डे केअर सेंटर, वृद्धाश्रम, मेडिकल या बाबींची माहिती दिली जाते. वकिलांकडून कॉलवर कायदेविषयक मार्गदर्शनही केले जाते.