Breaking

Mahayuti Government : नाफेडची सोयाबीन खरेदी ठप्प; सरकारचे दुर्लक्ष

बुलढाणा

Soybean purchase of NAFED stopped : बारदानाच नाही, 56 केंद्रांवरील खरेदी प्रभावीत

बाजार भावापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा Farmers कल नाफेडच्या खरेदीकडे असताे. मात्र, गत काही दिवसांपासून बारदाना नसल्याने Buldhana जिल्ह्यातील नाफेडची खरेदी ठप्प झाली आहे. बारदाना नसल्याने 56 केंद्रांवरील खरेदी प्रभावीत झाली आहे. जिल्ह्यात सरासरी किमान 30 हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी हाेते. त्यासाठी दररोज किमान 47 हजार पोत्यांची (बारदाना) आवश्यक आहे. परंतु, हा पुरवठाच कमी हाेत असल्याने खरेदी प्रभावीत झाली आहे. या एकूणच परिस्थितीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

जिल्ह्यात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशन, विदर्भ को-ऑपरेटिव्ह फेडरेशन नागपूर आणि पृथाशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनी अहिल्यानगर यांच्या माध्यमातून 56 केंद्रावर हमी भावाने सध्या सोयाबीनची खरेदी सुरू़ आहे. यापैकी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन अतंर्गत 23 केंद्रावर खरेदी करण्यात येत असून, त्यातील 9 केंद्र बऱ्याच दिवसांपासून बंद आहेत. अन्य यत्रणांकडून खरेदी होत असली तरी तेथेही बारदान्याअभावी खरेदीची समस्या आहे.

चिखलीमधील दोन केंद्र, मोताळा जानेफळ, साखरखेर्डासह अन्य केंद्रावर बारदान्याचा तुटवडा असल्याने तेथील खरेदी प्रभावीत झाली आहे़ जानेफळ केंद्रावर, तर तब्बल सहा दिवस खरेदी बंद होती. मागणीच्या तुलनेत निम्मा पुरवठा होत असल्याची ओरड आहे. त्याचा विपरीत परिणाम शेतकऱ्यांवर होत असून खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागत आहे.

16 हजार 56 शेतकऱ्यांच्या साेयाबीनची खरेदी

नाफेडच्या 56 केंद्रावर जिल्ह्यातील 73 हजार 21 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 42 हजार 250 शेतकऱ्यांना नोंदणी संदर्भातील मॅसेज गेलेले आहेत. त्यापैकी 16 हजार 56 शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन त्यांच्या सोयाबीनची विक्री केली आहे. आतापर्यंत 3 लाख 44 हजार 391 क्विंटल सोयाबीनची खरेदी झालेली आहे. महाराष्ट्र स्टेट को. ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत आतापर्यंत 1 लाख 26 हजार 201 क्विंटल सोयाबीन हा आतापर्यंत गोडावूनमध्ये सुरक्षितपणे साठविण्यात आला आहे.