The Bhil community in Warkhed remains neglected even after 75 years of Independence : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही उपेक्षितच; शासकीय योजना पोहोचल्याच नाहीत
Chikhali स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटल्यानंतरही बुलढाणा जिल्ह्यातील वरखेड येथील भिल्ल समाजाचे नागरिक आजही मूलभूत हक्कांपासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव समाेर आले आहे. भिल्ल समाजातील नागरिकांकडे जन्मदाखला नसल्यामुळे आधार कार्ड मिळालेले नाही, परिणामी महिलांना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा लाभही नाकारला गेला आहे. शासनाच्या सर्व योजना कागदोपत्री ओळखीवरच चालतात आणि हीच ओळखच त्यांच्याकडे नसल्याने हा समाज अजूनही अंधारात आहे.
वरखेड गावातील लोकसंख्या सुमारे १,७०० आहे. येथे जिल्हा परिषदेची नामांकित शाळा असतानाही भिल्ल समाज शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या प्रचंड मागे आहे. भटकंती करणारा समाज स्थिरावला खरा, पण त्यांची सरकारी यंत्रणेकडील नोंद न झाल्याने अनेकांचा जन्म जंगलातच झाला. त्यामुळे जन्मदाखले नाहीत, आणि त्याचे थेट परिणाम म्हणजे – आधार कार्ड नाही, मतदार यादीत नाव नाही, सरकारी योजनेचा लाभही भिल्ल समाजातील नागरिकांना मिळत नसल्याचे चित्र आहे.
Anna Bhau Sathe social forum : संस्था राजकीय होतेय म्हणत अध्यक्षांसह अनेकांचे राजीनामे
मतदान कार्ड नसल्यामुळे हा समाज मतदारच ठरत नाही. त्यामुळे राजकीय यंत्रणाही त्यांच्या समस्या दुर्लक्षित करते. या समाजाचे “कागदोपत्री अस्तित्वच” व्यवस्थेने स्वीकारलेले नाही, हे अत्यंत गंभीर आहे.या समाजातील मुले केवळ शाळेच्या यादीत दाखवली जातात; प्रत्यक्ष हजेरी मात्र नगण्य. शैक्षणिक दुर्लक्ष, जागरूकतेचा अभाव आणि सरकारी मदतीअभावी यांचे भविष्य अंधकारमय बनले आहे. शिक्षणाअभावी रोजगाराचा मार्गही बंद आहे.








