The Shubmangal Yojana in impactless : लाभार्थीच मिळेना, उपवर-वधूंची योजनेकडे पाठ
Wardha महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या शुभमंगल विवाह योजनेला लाभार्थीच मिळत नाहीत. शासनाने योजनेसाठी १०० लाभार्थीचे उद्दिष्ट दिलेले असताना, मागील तीन वर्षांत एकाही लाभार्थ्याने नोंद केली नसल्याने या योजनेचा उद्देशच सफल होत नसून बट्याबोळ झाल्याचे चित्र आहे.
शुभमंगल सामूहिक विवाह योजना ही जिल्ह्यातील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात येते. योजनेमार्फत जिल्ह्यातील खुले प्रवर्ग व इतर मागासवर्ग प्रवर्गातील एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या निराधार, विधवा, परितक्त्या महिलांच्या दोन मुलींच्या विवाहाकरिता लागू करण्यात आली आहे.
Mahayuti Government : सरकारच्या परवानगीने १५ रुपयांची बॉटल २० रुपयांना?
विवाह करणाऱ्या जोडप्याला २५ हजार, तर सामूहिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या संस्थेला जोडप्यामागे रुपये २,५०० अनुदान देण्यात येते. असे असले तरी जिल्ह्यात या योजनेला थंड प्रतिसाद मिळाला असून या योजनेचा बट्याबोळ झाल्याचे दिसून येत आहे.
योजना राबविताना किमान ५ व कमाल १०० जोडप्यांचा समावेश करण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. स्वयंसेवी संस्थेला वर्षातून दोनदा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करता येतो. संस्थेने पात्र लाभार्थींची यादी किमान एक महिना अगोदर सादर करणे आवश्यक असते. विवाह सोहळ्यात भाग घेतलेल्या जोडप्यांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग व विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Mahayuti Government : खुशखबर! मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग पूर्ण
शुभमंगल सामूहिक विवाह योजनेसाठी पूर्वी शासनाकडून १० हजारांची मदत दिली जात होती, आता ती वाढवून २५ हजार रुपये करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यात आठ तालुके असूनही योजनेला मागील तीन वर्षांपासून प्रतिसादच मिळत नसल्याचे महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आले. योजनेचे लाभार्थी अधिकाधिक वाढावे, यासाठी महिला बालविकास विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
ज्या नोंदणीकृत संस्था शुभमंगल सामूहिक योजना राबविण्यासाठी उत्सुक असतील, त्यांनी खुले प्रवर्ग व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील दाम्पत्यांसमवेत त्वरित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधात विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घ्यावेत. मागील तीन वर्षांपासून या योजनेत एकाही लाभार्थ्याने लाभ घेतलेला नाही, असे सांगण्यात आले








