Demand to remove Rupali Chakankar from the post of president : अध्यक्षपदावरून हटवण्याची महिला मुक्ती मोर्चाची मागणी
Amravati राज्यातील महिलांना न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना पदावरून हटविण्यात यावे, त्यांच्या जागेवर महिला मुक्ती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संगीता वाघ यांची निवड करावी, अशी मागणी मराठी पत्रकार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महिला मुक्ती मोर्चाद्वारे करण्यात आली आहे.
सध्या राज्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण गाजत आहे. यासारखी महिला अत्याचाराची अनेक प्रकरणे राज्यात घडत आहेत. महिला आयोग राज्यातील महिलांना न्याय मिळवून देण्यात सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळे महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची हकालपट्टी करण्यात यावी, त्यांच्या जागेवर महिला मुक्ती मोर्चा या सामाजिक संघटनेच्या अध्यक्षा संगीता वाघ यांची नियुक्ती करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.
Amravati Administration : किती हा पाण्याचा उपसा? आता विहिरी खोदायच्या नाहीत
संगीता वाघ या मागील पंधरा वर्षापासून महिला मुक्ती मोर्चा संघटनेच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करीत आहेत. आतापर्यंत ३००० महिलांना न्याय मिळवून दिल्याचा दावा पत्रकार परिषदेत करण्यात आला. महिला मुक्ती मोर्चा ही संघटना राज्यभर कार्यरत असून, संपूर्ण राज्यातील कार्यकर्त्यांची ही मागणी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Bacchu Kadu : प्रहारचे कार्यकर्ते चढले टाकीवर; शोले स्टाईल आंदोलन
पत्रकार परिषदेला अशोक खरात, विनोद गुलदेवकर, संगीता वाघ, जिल्हाध्यक्ष संगीता इंगळे, शहराध्यक्ष विजया काळे, आशा सोळंके, लता सोळंके, ज्योत्स्ना चव्हाण, अनिता वानरे, प्रतिभा खेतकडे, नीतू ठाकूर, रंजना खेतकडे, वंदना बनसोडे, सुनीता फुकट, कविता हुमे, चंदा प्रभे, मंगला पातुर्डे, उमा जनबंधू, संगीता परभे, वर्षा ढोके, सोनल विल्हेकर, श्रद्धा पवार, सुकेशनी बढे, दक्षिणा गावंडे, मंगला बारसे, मीना खांडेकर, रजनी तायडे, शितल कळसकर यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.