Free sand for beneficiaries of Ramai Gharkul Scheme : आंदोलनानंतर मागणी मान्य; टॅक्स सक्ती रद्द
Buldhana सामाजिक न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या समतेचे निळे वादळ संघटनेच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ ब्रास रेती मोफत देण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तसेच घरकुल मंजुरीसाठी लागू असलेली टॅक्स भरण्याची सक्तीही रद्द करण्यात आली आहे.
ही योजना मंजूर होऊनही नगर परिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अनेक लाभार्थ्यांना घरकुल उभारणीसाठी आवश्यक असलेली मोफत रेती मिळत नव्हती. यामुळे योजना अंमलबजावणीत अडथळे निर्माण होत होते. या अन्यायाविरोधात माजी नगरसेवक अशांतभाई वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने जोरदार धडक दिली.
Transfers of IAS officers : अकोला, बुलढाण्याला मिळाले नवीन पोलीस अधिक्षक!
या आंदोलनादरम्यान मलकापूर नगर परिषद व तहसील कार्यालयावर शेकडो लाभार्थ्यांसह मोर्चा नेण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे आणि तहसीलदार तथा नगर परिषद प्रशासक राहुल तायडे यांची भेट घेऊन लाभार्थ्यांच्या अडचणी मांडण्यात आल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून संघटनेच्या मागण्या मान्य केल्या.
या निर्णयामुळे घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. प्रशासनाच्या अनास्थेमुळे अनेक गरीब लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळत नव्हता. मात्र, सामाजिक संघटनांच्या राजकीय दडपणामुळे अखेर शासन यंत्रणेला झुकावे लागले, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांकडून मदतीचा हात अन् सुरेखा शिंदे स्वतःच्या पायावर उभ्या झाल्या!
या आंदोलनात समतेचे निळे वादळ संघटनेचे मोहन खराटे, दीपक मेश्राम, दिलीप इंगळे, भारत महाले, मिलिंद वानखेडे, सुरेंद्र सरदार, लकी शेगोकार, सुरेश इंगळे यांच्यासह शेकडो महिला व पुरुष लाभार्थी उपस्थित होते.