Step aside the traitors, give a chance to the new leadership : मलकापूर येथील काँग्रेस आढावा बैठकीत ठाम मागणी
Buldhana ‘पद काँग्रेसचे, पण काम विरोधकांसाठी’ या वृत्तीमुळे पक्षात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा गद्दारांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची गरज असल्याचा सूर काँग्रेसच्या आढावा बैठकीत उमटला. मलकापूर येथील जनता कला व वाणिज्य महाविद्यालयात ७ एप्रिल रोजी ही बैठक पार पडली.
प्रदेश काँग्रेसच्या फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीस निरीक्षक म्हणून काँग्रेस नेते राजेंद्र राख उपस्थित होते. माजी आमदार राजेश एकडे, जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, डॉ. अरविंद कोलते, लक्ष्मणराव घुमरे आदींनी मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी मागील निवडणुकीतील निष्क्रियता, गटबाजी यावर नाराजी व्यक्त करत स्पष्ट भूमिका मांडली.
Bihar Politics : अकोल्याचे सुपुत्र शिवदीप लांडे गाजवणार बिहारचे राजकारण!
यावेळी माजी नगराध्यक्ष श्यामकुमार राठी, अशोकराव हिंगणे, डॉ. मोहम्मद इसरार, विजयसिंह राजपूत, पद्मराव पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. निरीक्षकांनी कार्यकर्त्यांचे मत ऐकून घेतले. Rahul Bondre राहुल बोंद्रे म्हणाले “संघटनात्मक रचना हाच काँग्रेसचा आत्मा आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने संघटनेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.” जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ही बैठक सातपुडा कॅम्पस येथील उमादेवी सभागृहात पार पडली.
या बैठकीत माजी आमदार कृष्णराव इंगळे, पक्ष नेत्या डॉ. स्वाती वाकेकर, प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले, माजी जि.प. अध्यक्ष प्रकाश पाटील, निरीक्षक डॉ. इसरार, तालुका निरीक्षक जावेद कुरेशी, नीलेश पाऊलझगडे, वा. रा. पिसे, तेजराव मारोडे, मोहतेशाम रजा, तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर, राजेंद्र वानखडे, किरणबापू देशमुख, अर्जुन घोलप आदींची उपस्थिती होती.
Water shortage : मुख्यमंत्र्यांसह तीन मंत्री, डझनावर आमदार; तरी नळाला नाही धार!
डॉ. स्वाती वाकेकर यांनी, “देशात परिवर्तन घडवण्याची खरी ताकद काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येच आहे,” असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन अविनाश उमरकर यांनी केले, तर राजेंद्र वानखडे यांनी आभार मानले. शेवटी दिवंगत माजी अध्यक्ष दीपक सलामपुरिया यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.