Mandal Yatra : ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये हाच हेतू !

Prakash Ambedkars allegations on Pawars Mandal Yatra : पवारांच्या मंडळ यात्रेवर प्रकाश आंबेडकरांचा आरोप

Nagpur : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यभर सुरू झालेल्या मंडळ यात्रेवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे. आंबेडकर यांनी आरोप केला की, या यात्रेचा उद्देश ओबीसी समाजाला श्रीमंत मराठ्यांविरोधात जाण्यापासून परावृत्त करणे हा आहे, कारण श्रीमंत मराठे हा एनसीपीचा मुख्य आधारवर्ग आहे.

शरद पवार यांनी नागपूरात मंडळ यात्रेला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. ही यात्रा राज्यातील सर्व जिल्ह्यांत जाणार आहे. मात्र, यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला राष्ट्रवादीने विरोध केला होता. मागील निवडणुकांमध्ये ओबीसी भाजपकडे झुकला होता. आता ओबीसींच्या लक्षात आले आहे की, एक नागनाथ आहे आणि दुसरा साधनाग आहे. त्यामुळेच पवार यांची ही यात्रा ओबीसींना श्रीमंत मराठ्यांविरोधात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला.

Vijay Wadettiwar : एसआयटी नेमली म्हणजे कारवाई झाली असं नाही !

शरद पवार यांनी 160 विधानसभा जागांच्या दाव्याबाबतही आंबेडकरांनी हल्लाबोल केला. हा दावा म्हणजे वराती पाठीमागून घोडं आहे. आम्ही यापूर्वी सर्व पक्षांना कोर्टात जाण्याचे आवाहन केले होते, पण कोणीही सोबत आले नाही. कोर्टच एकमेव ठिकाण आहे, जिथे दूध का दूध आणि पाणी का पाणी होतं. आता मात्र फक्त बोंबलत बसतात,” अशी टीका त्यांनी केली.

Chandrashekhar Bawankule : मतदार याद्या आत्ताच तपासून घ्या, मग हरल्यावर आरोप करू नका !

आंबेडकर म्हणाले, शरद पवार खोटं बोलत आहेत. नाव विचारली तर आठवत नाहीत म्हणतात. खोटं बोलण्यालाही एक मर्यादा असते. मंडल यात्रेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या विधानांमुळे ओबीसी राजकारण आणि आगामी निवडणुकांवरील चर्चा अधिकच तापली आहे.