Mandul snake deal for two lakh rupees : पाच जणांना अटक; तस्करी रोखण्यात पोलिसांना यश
Wardha नागपूर जिल्ह्यातून चारचाकीने मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या पाच तस्करांना सेलू पोलिसांनी सेलू बायपास रस्त्यावरील कोहिनूर हॉटेलसमोर नाकाबंदी करून पकडले. पाचही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून दोन तोंड असलेल्या मांडूळ जातीच्या साप ताब्यात घेतले. हिंगणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना बोलवून घेतले. त्यानंतर आरोपींकडून कार जप्त केली.
या सापाची वाशिम जिल्ह्यात तस्करी होणार होती. यासाठी दोन लाख रुपयांत सौदाही झाला होता. मात्र, पोलिसांनी तस्करी रोखली. केशव लक्ष्मण भराडी (३४), सिद्धार्थ धोंडबा कांबळे), मजहर हक मोहम्मद जाफर मालवी (७१), तुकाराम ज्ञानेश्वर छापे (३४), अनिलकुमार पंचानन नायक (३४) अशी अटक आरोपींची नावे आहे.
DBT portal process in Government scheme : साडेपाच हजार जणांचे अनुदान रखडणार
संशयित कार (क्र. एमएच ३० एएफ ८४६९) बुटीबोरी येथून वर्ध्याकडे येत असल्याची माहिती होती. पाेलिसांनी नाकाबंदी केली असता आरोपींकडे असलेल्या पिशवीतून ३.५ किलो वजनाचा मांडूळ प्रजातीचा साप आढळून आला. या जिवाची विक्री किंवा गुप्तधन शोधण्याच्या उद्देशाने तस्करी करताना मिळून आले.
आरोपींना पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी वनअधिकारी दिनेश उईके, वनपरिक्षेत्र अधिकारी ए. आर. आगासे यांनी ताब्यात घेतले. ही कारवाई प्रभारी पोलिस निरीक्षक यशवंत सोळसे, मनोहर मुडे, निरंजन वरभे, अखिलेश गव्हाणे, सचिन वाटखेडे, योगेश सोरते यांनी केली.
सेलू पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना आरोपींना मांडूळ सापासह पकडले असता आरोपींनी कर्मचाऱ्यांना दहा लाख रुपयांची ऑफर देत कारवाई करण्यास मनाई केली होती. मात्र, पोलिसांनी ऑफरला धुडकावून लावत अटक करून वनविभागाच्या स्वाधीन केले.