Breaking

Mangal Prabhat Lodha : मंत्री लोढा यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Congress aggressive over Minister Lodha’s statement : गुन्हा दाखल करण्याची मागणी; पोलिसांत तक्रार

Buldhana राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वक्तव्याला विरोध दर्शवत सिंदखेडचे सरपंच व मोताळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रवीण आप्पा कदम यांच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून मंत्री लोढा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

ठाणेदार नागेश जायले यांना दिलेल्या निवेदनात काँग्रेस नेत्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, मंत्री लोढा यांनी केलेले वक्तव्य इतिहासाच्या विरुद्ध असून राष्ट्रपुरुषांचा अवमान करणारे आणि समाजात तेढ निर्माण करणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचा अपमान करणाऱ्या कोणत्याही वक्तव्याचे समर्थन करता येणार नाही, असा संतप्त सूर काँग्रेसच्या निवेदनातून उमटला.

Mahayuti Government : केशरी रेशनकार्डधारक वंचितच; गरजूंना स्वस्त धान्य नाकारले

या निवेदनावर प्रवीण कदम यांच्यासह अलीम कुरेशी, मुखत्यार खासाब, जमीर कुरेशी, महमुद पठाण, विकास उजाडे, दिलीप मोरे यांची स्वाक्षरी आहे. सदर वक्तव्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असून, याप्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कायदेशीर कलमान्वये गुन्हा नोंदवावा, अशी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी आहे.

Ex-MLA Virendra Jagtap : माजी आमदाराची अरेरावी; असंवैधानिक भाषेच्या वापराचा निषेध

राजकीय दृष्टीने पाहता, मंत्री लोढा यांच्यावर काँग्रेसने थेट आरोप करत कारवाईची मागणी केल्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळण्याची शक्यता आहे. शिवप्रेमी संघटनांचाही या मुद्द्यावर लवकरच आवाज उठण्याची चिन्हं आहेत. आगामी काळात याप्रकरणाचा राजकीय भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.