वक्फ (दुरुस्ती) विधेयक लोकसभेत मंजूर
New Delhi : वक्फ (दुरुस्ती) विधेयकाला लोकसभेत २८८ मतांनी मंजुरी मिळाली आहे. यामुळे पारदर्शकता, प्रशासनिक सुधारणा आणि सर्वसमावेशकतेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. या विधेयकामुळे कोणाच्याही जमिनी बेकायदेशीरपणे बळकावल्या जाणार नाहीत, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने देशातील नागरिकांना न्याय देण्यासाठी हे विधेयक आणले आहे. त्याबद्दल पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि सर्वांचेच मनःपूर्वक अभिनंदन करतो. आदरणीय पंतप्रधानांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे अतिशय महत्वाचे विधायक आहे.
Mangalprabhat Lodha : सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रात उभारणार जागतिक कौशल्य केंद्र!
या विधेयकामुळे पारदर्शकता वाढेल आणि सामान्य नागरिकांचे हक्क संरक्षित होतील. विरोधकांनी याआधीही कलम 370, CAA आणि राम मंदिराबाबत भीती पसरवण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्षात कोणत्याही समाजाच्या हक्कांवर कुठलाही आघात झाला नाही. आपले सरकार सबका साथ, सबका विकास, या धोरणावर ठाम आहे. पीडित नागरिकांचे रक्षण करणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे.
Ajit Pawar : ऊसतोडणी मुकादमांकडून शेतकरी व मजुरांची होणारी फसवणूक थांबणार !
या विधेयकामुळे गरिबांच्या जमिनी आता बळकावल्या जाणार नाहीत. खोट्या व्यवहारांमुळे नुकसान होणार नाही आणि वक्फ मालमत्तांबाबत होणाऱ्या गैरव्यवहारांवर अंकुश येईल. जमीन हस्तांतरण प्रक्रियेत पारदर्शकता आणणारे हे विधेयक ऐतिहासिक ठरेल. विरोधकांनी या विधेयकावर टीका केली असली, तरी लोकसभेत झालेल्या मतदानावरून बहुसंख्य खासदारांनी या कायद्याला पाठिंबा दर्शवला असल्याचे मंत्री लोढा म्हणाले.