The Sarpanch’s concept will lead to the development of Aherali village : आदर्श उपक्रम बनला पर्यावरणप्रेम, जबाबदारी, आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक
Yavatmal : यवतमाळ जिल्ह्याच्या आदिवासीबहुल झरी जामणी तालुक्यातील एक छोटेसे गाव अहेरअल्ली. काही वर्षांपूर्वी विकास या शब्दाचा अर्थही या गावातील लोकांना ठाऊक नव्हता. पण म्हणतात ना.. ‘गाव करी ते राव ना करी..’ गावकऱ्यांनी ‘एकीचे बळ’चा परिचय देत. गावाला विकासाच्या उंचीवर नेण्याचा निश्चय केला आणि पहिले काम केले ते म्हणजे निवडणूक न घेता आपले शिलेदार निवडले. ग्रामपंचायत अविरोध आली. या शिलेदारांचे नेतृत्व दिले हितेश ऊर्फ छोटू राऊत या दूरदृष्टी असलेल्या जिद्दी, उमद्या तरूणाकडे..
अहेरअल्ली हे गाव निरनिराळ्या उपक्रमांमुळे नेहमी चर्चेत असते. आता हे गाव चर्चेत आले आहे येथे होणाऱ्या आमराईमुळे. सरपंच राऊत यांनी प्रत्येक कुटुंबाने एक केसर आंब्याचे झाड लावण्याचे आवाहन केले. त्याला जनतेने त्वरित प्रतिसाद दिला. अन् सुरू झाली गावाला आमराई बनवण्याची मोहिम. या अभिनव उपक्रमाची संकल्पना व यशस्वी अंमलबजावणी छोटू राऊत यांच्या नेतृत्वात पार पडली. त्यांच्या दूरदृष्टीतून प्रेरणा घेऊन ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पदाधिकारी, युवक मंडळ, महिला बचत गट आणि समस्त ग्रामस्थांनी एकजुटीने सहभाग घेतला आणि हा उपक्रम एक चळवळ बनवली.
Fake school ID : शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन
अहेरअल्ली गावातील प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरासमोर किंवा शेतात एक केशर आंब्याचे झाड लावावे, आंब्याचे रोप मोफत देण्यात येणार आहे. झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी संबंधित कुटुंबांनी स्वतः घेणे अपेक्षित आहे. झाडांची योग्य प्रकारे निगा आणि संरक्षण करण्याची जबाबदारी त्या कुटुंबाची असेल. झाडाला लागणारी फळे त्या कुटुंबियांच्या मालकीची असतील. भविष्यात पर्यावरण पूरक गाव निर्मितीस यामुळे मदत होणार आहे.
S.T. Corporation : स्वातंत्र्यानंतर प्रथमच तिखाडी, उमरा, दुधा गावांत आली एसटी बस !
हा उपक्रम केवळ झाडे लावण्यापुरता मर्यादित न राहता, पर्यावरणप्रेम, जबाबदारी, आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरतो आहे. लावलेले झाड केवळ फळ देणारे नाही, तर आमच्या पुढच्या पिढीसाठी हरित वारसा देणारे ठरणार आहे. “एक झाड… अनेक फायदे” या संकल्पनेला अनुसरून अहेरअल्ली गाव पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक आदर्श उभा करत आहे. या उपक्रमासाठी योगदान देणाऱ्या सकल ग्रामस्थांचे, पदाधिकाऱ्यांचे, आणि विशेषतः नेतृत्व करणाऱ्या सरपंच छोटू राऊत यांचे परिसरात कौतुक होत आहे. तसेच उपसरपंच अनिल विठोबा राऊत, सदस्य गजानन नरहरी सिडाम, अमृता हितेश राऊत, पुष्पा बंडू राऊत, मनीषा योगेश दुधकोहळ व सविता संजय मन्ने यांनी विशेष परिश्रम घेतले.
निवृत्त शिक्षक सुधाकर राऊत, शंकर केमेकार, नायब तहसीलदार मसराम, बनपेलवरर, कृषी सहाय्यक ताटे, रिवास भोयर, रोहित राऊत, तलाठी चांदेकर, मंडळ अधिकारी ऋषी राऊत यांचे या उपक्रमाला महत्वपूर्ण सहकार्य लाभले.