Manikrao Kokate : एक रुपया भीकेत मिळत नाही, आम्ही तर पिक विमा देतोय!

Agriculure Minister compares Farmers with Beggars : कृषीमंत्री कोकाटेंचे वादग्रस्त विधान; विरोधकांकडून टीका

Nagpur राज्याचे कृषीमंत्री माणिकाराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी केल्याने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे. आज १ रुपया भिकेत सुद्धा कुणी देत नाही. पण एक रुपयात आम्ही पीक विमा योजना देत आहोत. त्यामुळे या योजनेत बदल करण्याची आवश्यकता असल्याचे विधान त्यांनी केले आहे. या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ajit Pawar) मंत्री असलेले माणिकराव कोकाटे हे वादग्रस्त विधान करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू असलेले कोकाटे यांनी आज पीक विमा योजनेबाबत बोलताना अजब तुलना केली आहे. राज्य सरकार पीक विमा योजना राबविण्यासाठी शेतकऱ्यांकडून एक रुपये टोकन रक्कम घेते. उर्वरित रक्कम राज्य सरकार विमा कंपन्यांना देते. ही योजना याच राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी सुरू केली आहे. परंतु नवे कृषी मंत्री मात्र या योजनेबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.

Radhakrushna Vikhe-Patil : सत्ता नाही म्हणून कुणी प्रदेशाध्यक्ष व्हायला तयार नव्हते!

प्रसार माध्यमांशी बोलताना कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, ‘अहो आजकाल भिकार्याला सुद्धा एक रुपये भिकेत कुणी देत नाही. आम्ही तर एक रुपयात पीक विमा देत आहोत. यामुळे दुसऱ्या राज्यातील लोकांनी अर्ज भरल्याने मोठ्या प्रमाणावर अर्ज आलेले आहेत. यासाठी या योजनेचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता असल्याचे विधान त्यांनी केले आहे.

CM Devendra Fadnavis : जलयुक्त शिवारमुळे महाराष्ट्र जलक्रांतीच्या दिशेने!

सत्ता डोक्यात गेली आहे – सुषमा अंधारे
महायुती सरकारच्या मंत्र्यांच्या डोक्यात सत्ता गेली आहे. त्यांना सत्तेची गुर्मी आली आहे. सत्तेचा माज आल्याने शेतकऱ्यांना ते भिकारी म्हणत आहे. या मंत्र्यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी समज देण्याची आवश्यकता आहे. ईव्हीएममुळे मिळालेल्या सत्तेचा माज या मंत्र्यांना आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा ते कस्पटासमान संबोधू लागले आहेत, असं उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे Sushma Andhare म्हणाल्या आहेत.