Breaking

Manikrao Kokate ; सुरज चव्हाणची उचल बांगडी, माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद धोक्यात!

Ajit Dadas action, Tatkare said party will take the right decision on Agriculture Minister : अजित दादांचा दणका, तटकरे म्हणाले, कृषिमंत्र्याबाबत पक्ष योग्य निर्णय घेईल!’

Mumbai : अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची अखेर उचलबांगडी झाली आहे. अजित पवार यांनी चव्हाण यांना तातडीने भेटायला बोलावले होते. मात्र, या भेटी पूर्वीच अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची सूचना दिली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही चव्हाण यांच्या कृत्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती. सोबतच त्यांनी माणिकराव कोकाटे यांचा बद्दल बोलताना म्हणले आहे की, त्यांच्याकडून अयोग्य घडलं, पक्ष योग्य निर्णय घेईल!’

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सातत्याने वादग्रस्त वक्तव्यं केल्याचे समोर आले. त्यातच त्यांचा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यात कोकाटे यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली एक प्रकारामुळे, अजित पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात राज्यभर वातावरण पेटले आहे. या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांचे कृषीमंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या वर्तनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Suraj Chavhan : माफी मागितली पण, सूरज चव्हाणांवर गुन्हा दाखल, अटकेसाठी ‘छाया’ आक्रमक!

पक्ष त्यांच्यासंदर्भात योग्य निर्णय घेईल, असे सूचक वक्तव्यही तटकरे यांनी केले. ते सोमवारी धाराशिव येथे छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शेतकरी संकटात असताना कृषीमंत्रि पदासारखं महत्त्वाचं आणि संवेदनशील विभाग असणाऱ्या मंत्र्याने शेतकऱ्यांसाठी योग्यप्रकारे कार्यरत राहिले पाहिजे. त्यांच्या कडून घडलं ते अयोग्य होते. पक्ष त्यांच्यासंदर्भात योग्य निर्णय घेईल, त्यांनी स्पष्ट केले. काहीवेळेला माणिकराव कोकाटे यांची शेतकऱ्यांसंदभात जी, वक्तव्य आली ती चुकीची होती. या प्रकरणाची गंभीर नोंद घेऊन अजितदादांनी कोकाटे यांना समज दिली होती. काल त्यांनी रमी खेळतानाच्या व्हिडीओवर जो खुलासा केला तो चुकीचाच होता. शेतकरी संकटात असताना कृषीमंत्र्यांनी अशाप्रकारे वागणे योग्य नाही, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut : भाजपने ‘हनी ट्रॅप’ लावून महाविकास आघाडी सरकार पाडले !

सुनील तटकरे यांची ही वक्तव्यं पाहता आता माणिकराव कोकाटे यांचं कृषीमंत्रिपद धोक्यात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे अजित पवार हे कोकाटे यांच्या संदर्भात काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तटकरे यांनी काल लातूरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. आज अजित दादा आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्षाविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली. तसेच सुरज चव्हाण आणि काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. त्यानंतर अजित दादांनी दणका देत सुरज चव्हाण यांची बांगडी केली. या विषयावरून आता कृषीमंत्र्यांचे पद धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.

_______