CM Fadnavis expressed displeasure, said it is wrong for any minister make such statement :
मुख्यमंत्री फडणवीस यांची नाराजी म्हणाले कुठल्याही मंत्र्याने असं वक्तव्य करणं चुकीचं
Mumbai : रमी खेळताना च्या व्हायरल व्हिडिओ मुळे वादात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी प्रतिक्रिया देत आहेत. आपले खुलासे करताना ते आणखीनच वादात सापडत आहेत. शेतकरी नव्हे ‘ हे सरकारच भिकारी आहे’ असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे वाद आणखीनच वाढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली असून कुठल्याही मंत्र्याने असं वक्तव्य करणं चुकीचं आहे असे स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांच्या पिकविम्याबाबत बोलताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काही महिन्यांपूर्वी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावर स्पष्टीकरण देताना कोकाटे यांनी आणखी एक वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारची गोची झाली आहे. कोकाटे म्हणाले, ‘ शेतकऱ्यांकडून शासन एक रुपया घेतं. सरकार शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही. म्हणजे भिकारी कोण आहे? शासन भिकारी आहे, शेतकरी नाही.’
Manikrao Kokate : मला जंगली रमी येत नाही, दोषी असेल तर राजीनामा देतो
दरम्यान, कोकाटे यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, मी काही त्यांचं वक्तव्य ऐकलेलं नाही. परंतु, त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर ते चुकीचं आहे. कुठल्याही मंत्र्याने असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. पिकविम्याबाबत अतिशय चुकीची माहिती पसरली गेली आहे. पिकविम्याबाबत आपण काही चांगले निर्णय घेतले आहेत. पिकविम्याची आधीची जी पद्धत होती त्यात शेतकऱ्यांना फायदा होत होता.
Manikrao Kokate ; सुरज चव्हाणची उचल बांगडी, माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद धोक्यात!
मात्र, त्याहून अधिक फायदा विमा कंपन्यांचा होत होता. त्यामुळे आम्ही त्या पद्धतीत बदल केले. यासह आम्ही आणखी एक मोठा निर्णय घेतला. राज्याच्या कृषी क्षेत्रात दर वर्षी 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाच वर्षांत आपलं सरकार राज्याच्या कृषी क्षेत्रात 25 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामुळे कृषी क्षेत्राला मोठा फायदा होईल.
एखाद्या मंत्र्याने असं वक्तव्य करणं योग्य नाही. मी आजही सांगतो की देशातील इतर राज्यांच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था चांगली आहे. मी असं म्हणत नाही की आपली अर्थव्यवस्था सर्वात चांगली आहे किंवा आपण श्रीमंत आहोत, आपल्याकडे खूप पैसा आहे असं मी म्हणणार नाही. मात्र, देशातील जी विकसनशील राज्ये आहेत त्यांच्या तुलनेत आपली स्थिती नक्कीच चांगली आहे. मान्य आहे की आपल्यापुढे खूप आव्हानं आहेत. मात्र, आपल्या राज्याची वित्तीय तूट ही आम्ही सातत्याने तीन टक्क्यांहून कमी ठेवली आहे.अशी माहिती ही फडणवीस यांनी दिली.
Manikrao Kokate : कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार
कोकाटे हे वेगवेगळे खुलासे करत आहेत आणि आपल्याच खुलासात अडकत आहेत. आधी त्यांनी मी जाहिरात स्किप करत होतो तेवढाच व्हिडिओ दाखवला अशी टीका केली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आणखी दोन व्हिडिओ पोस्ट करत कोणता पत्ता कुठे लागला ते पहा असे सांगत कोकाटे यांचा दावा होत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर कोकाटे यांनी माझी बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचेल असे सांगत पुन्हा जाहिरात स्किप करायला 30 सेकंद लागतात असे स्पष्ट केले होते. रोहित पवारांनी आता त्यांचा 42 सेकंदाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. सोबतच कोणती जाहिरात इतकी मोठी असते असा उलट सवाल केला आहे.
____