Manikrao Kokates explanation allegations are baseless, I have been defamed : माणिकराव कोकाटे यांचे स्पष्टीकरण आरोप बिनबुडाचे, माझी बदनामी झाली
Mumbai :कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात मोबाईलमध्ये रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर पोस्ट झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या विषयावरून राज्यभर वातावरण तापले आहे. कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोरदार असताना त्यांनी स्वतःहून पुढे येऊन स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की माझ्यावरील सर्व आरोप बिन दुधाचे आहेत. या प्रकरणामुळे माझी महाराष्ट्रभर बदनामी झाली. मला पण मी खेळता येत नाही. त्यासाठी माझे बँक खाते लिंक असावे लागते. तसे काही असेल आणि मी दोषी असेल तर राजीनामा देईल.
माणिकराव कोकाटे म्हणाले की, हा छोटा विषय आहे. हा विषय एवढा लांबला का? हे कळत नाही. ऑनलाइन रमी तुम्हाला माहिती आहे का? त्याला बँकेचे खाते जोडावे लागते. माझा असा कोणताही मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट ऑनलाईन रमीच्या अँपला जोडलेला नाही. कुठेही चौकशी करा. ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरु झाली आहे, तेव्हापासून मी एक रुपयाची रमी खेळलेली नाही. किंबहुना मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे माझ्यावरील आरोप बिनबुडाचा आहेत. यामुळे माझी महाराष्ट्रात बदनामी झाली आहे. कारण असताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे, ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आहे, ज्यांना माझी बदनामी केली आहे.
Farmers suicide : न्यायासाठीचा अन्नत्याग; स्वाती नागरे यांचे आंदोलन सुरू
त्यांना कोर्टात खेचल्या शिवाय मी राहणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी विरोधकांना दिलाय मी त्यादिवशी सभागृहात होतो, माझं काम होतं. मला माझ्या ओएसडीकडून माहिती हवी असेल तर मला एसएमएस किंवा फोन करावा लागतो. त्यांना सभागृहात आत येत नाही. त्यासाठी मी एक मोबाईल मागवला होता. मोबाईल उघडल्यावर त्याच्यावर तो गेम आला, त्या गेमचा सारखा पॉप-अप येतो. तो मला स्कीप करता आला नाही. तो मोबाईल माझ्यासाठी नवीन होता म्हणून मला गेम स्कीप करायला वेळ लागला. पण मी गेम स्कीप केल्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही, तो तुम्ही दाखवलाच नाही. मोबाईलवर एकच गेम येत नाही, वेगवेगळे गेम येतात. 30 सेकंद गेम स्कीप करता येत नाही.
माझा व्हिडिओ 11 सेकंदांचा आहे. त्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. पूर्ण व्हिडीओ दाखवला असता तर माझ्यावरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, हे स्पष्ट झाले असते, असे कोकाटे यांनी यावेळी म्हटले. मी आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती आणि विधानसभा अध्यक्षांना लेखी पत्र देणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे तुम्ही चौकशी करावी. मी ऑनलाईन रमी खेळत असेन, मी दोषी सापडलो तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणीही निवेदन करावं, त्या क्षणाला न थांबता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला न भेटता मी राज्यपालांकडे जाऊन माझा राजीनामा देईन, असे माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले आहे.