Breaking

Manohar Chandrikapure with Eknath Shinde : चंद्रिकापुरे पिता-पुत्र अखेर शिंदेसेनेत!

Chandrikapure father and son finally join Shindesena : अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नाकारली होती उमेदवारी

Gondia जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी आपल्या सुपुत्रासह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी नाकारली होती. तेव्हापासून ते नाराज होते. त्यानंतर ते प्रहार जनशक्तीमध्ये गेले. पण अखेर शिंदे सेनेतील प्रवेशावर त्यांनीच शिक्कामोर्तब केले.

भाजपला राजकुमार बडोले Rajkumar Badole यांचे पुनर्वसन करायचे होते. आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अर्जुनी मोरगाव सोडायचे नव्हते. महायुतीमध्ये दोन्ही पक्षांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. अशात दोन्ही पक्षांनी मध्य साधला. बडोले यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला. त्यामुळे मतदारसंघ भाजपच्या नेत्याकडे पण राष्ट्रवादीच्या खात्यात कायम राहिला. या संपूर्ण घडामोडीत चंद्रिकापुरे मात्र नाराज झाले. त्यांनी मुलगा सुगत यांच्यासह प्रहारमध्ये प्रवेश घेतला. आणि मुलालाच रिंगणात उतरवले. अर्थात त्यात त्यांना यश येऊ शकले नाही.

CM Devendra Fadnavis : नागपूरमध्ये होणार व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर

त्यानंतर चंद्रिकापुरे पिता-पुत्र शिंदे गटात प्रवेश करणार अशी चर्चा जोर धरू लागली. त्यावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले. मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दोघांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यांच्या शिंदेसेनेत प्रवेशाने गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेला पुर्ण विराम लागला आहे.

सुगत चंद्रिकापुरे यांनी प्रहारच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढविली होती. मात्र प्रहारमध्ये त्यांचे मन फारसे रमले नाही. त्यामुळे मनोहर चंद्रिकापुरे लवकरच शिंदेसेनेत पुत्रासह प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्या चर्चेला अखेर त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर पुर्णविराम लागला आहे.

Maharashtra Congress : हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार
माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे व त्यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. यानंतर आता लवकरच अर्जुनी मोरगाव येथे शेतकरी मेळावा होणार आहे. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नेतेमंडळी उपस्थित राहणार असल्याचे माहिती चंद्रिकापुरे यांनी दिली.