Bombardier Aircraft Left to Rust, Manoj Jaiswal in CBI Custody : हजारो कोटी रुपयांच्या कर्जाच्या पैशांतून घेतले होते विमान
Nagpur : बहूचर्चित कोळसा घोटाळा प्रकरणातील आरोपी मनोज जायस्वाल यांनी सुमारे १० वर्षांपूर्वी बॉम्बार्डीयन विमान खरेदी केले होते. महाराष्ट्रात येवढे मोठे विमान घेणारे राज्याच्या मोजक्या उद्योगपतींमधून ते एक ठरले होते. हे विमान त्यांनी कर्जाच्या पैशांतून घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. जायस्वाल यांना ११ हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. सद्यस्थितीत जायस्वाल यांची सीबीआयकडून कसून चौकशी सुरू आहे.
देशातील बहुचर्चित घोटाळेबाज निरव मोदी आणि विजय माल्या यांनी बुडवलेल्या कर्जाइतकाच मोठा मनोज जायस्वाल यांनी केलेला कर्ज घोटाळा असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. विविध बॅंकांकडून ११ हजार कोटी रुपये वेगवेगळ्या कामांसाठी वापरल्याचाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांनी बॅंकांकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज या रकमेपेक्षाही जास्त असल्याचे सांगितले जात आहे. सन २०१७ मध्ये मनोज जायस्वाल यांना सीबीआयने अटक केली होती. या प्रकरणात ते आत्तापर्यंत जामिनावर होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी आपला व्यवसाय आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणन येथे सुरू केला होता.
Local body election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ३-३ कोटीचा खर्च !
जवळपास १० वर्षांपूर्वी जायस्वाल यांनी बॉम्बार्डीयर विमान खरेदी केले होते. गेल्या नऊ वर्षांपासून हे विमान डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे धुळखात पडलेले आहे. जायस्वाल यांनी ज्या बॅंकांकडून कर्ज घेतले, त्या बॅंकांनी हे विमान विकून कर्जाची रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना ते जमले नाही.
युपीए सरकारच्या काळात झालेल्या कोळसा घोटाळा प्रकरणात तत्कालिन कोळसामंत्री श्रीप्रकाश जायस्वाल आणि मनोज जायस्वाल यांनी अनुभव नसलेल्या उद्योगांना कोळसा खाणी देण्यासाठी दलाली केली होती, असाही आरोप त्यांच्यावर आहे. या आरोपाखाली ईडी आणि सीबीआयने त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत. आता त्यांना अटक झाल्यामुळे या घोटाळ्यातील तपशील बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.