Manoj Jarange : मनोज जरांगे यांचा भुजबळांवर थेट हल्लाबोल!

I dont accept Bhujbal at all, he is just a Maratha : मी भुजबळ यांना ग्राह्यच धरत नाही, मराठा कुणबी एकच

Mumbai : राज्यात मराठा आरक्षणावरून संघर्ष चांगलाच पेटला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी “मराठ्यांना ओबीसी आरक्षण दिले तर आम्ही लाखोंच्या संख्येने मुंबईत धडकू” असा इशारा दिल्यानंतर, मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
“मी भुजबळ यांना ग्राह्यच धरत नाही. मराठा आणि कुणबी एकच आहेत. हे अंतिम सत्य आहे आणि यावर मी ठाम आहे. भुजबळ काय बोलतात याला महत्त्व नाही.”

आझाद मैदानात उपोषणाला बसलेले जरांगे यांनी आपल्या आंदोलकांना संयमाचे आवाहन केले.
“मुंबईचे रस्ते मोकळे करा, गाड्या रस्त्यावर लावू नका. जातीची मान खाली जाईल असं काही करू नका. मला माझ्या समाजाला जिंकवून द्यायचं आहे,” असे त्यांनी ठणकावले.

Reservation controversy : मराठ्यांना ओबीसी आरक्षण दिल्यास लाखोंचा ….

दरम्यान, भुजबळ यांनी स्पष्ट केले की ओबीसी प्रवर्गात आधीच ३७४ जाती आहेत. “मराठा समाजाला ओबीसीत सामावून घेऊ नका, अन्यथा आम्हीदेखील लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ,” असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे.मराठा आणि ओबीसी समाजाच्या ठाम भूमिकेमुळे राज्यातील आरक्षणाचा प्रश्न आता अधिकच तापला असून सरकारसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.