Manoj Jarang’s Agitation : जरांगेंच्या आंदोलनावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ‘वेट अॅंड वॉच’

National OBC Federation’s ‘wait and watch’ on the Maratha agitation : मराठ्यांनी पुन्हा ओबीसी आरक्षणातून मागणी करणे निरर्थक

Nagpur : मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे आंदोलन करण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा समाजाला कोणत्याही पद्धतीने ओबीसी आरक्षणातून वेगळे आरक्षण दिले जाणार नाही, असे सरकारने वारंवार सभागृहात सांगितले. त्यामुळे आता पुन्हा मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी करणे निरर्थक असल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत राष्ट्रीय ओबीसी महासंघ ‘वेट अॅंड वॉच’ च्या भूमिकेत आहे, असेही डॉ. तायवाडे म्हणाले. मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण दिले जाणार नाही, हे सरकारने विविध मंचांवरूनही सांगितले, तशी जाहिर घोषणाही केली आहे. त्यानंतरही मनोज जरांगे सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत सुटले आहेत. जरांगेंच्या या हेतुकडेही राष्ट्रीय ओबीसी महासंघ लक्ष ठेऊन असल्याचेही डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले.

Mohan Bhagwat : विश्वगुरू होण्यासाठी संघाची वाटचाल ; मोहन भागवत

गणेशोत्सवाची सर्वाधिक धामधुम महाराष्ट्रात असते. त्यातल्या त्यात मुंबईत हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आज (२७ ऑगस्ट) मुंबईतील सर्व सार्वजनिक गणेश मंडळे लाडक्या बाप्पाला आणण्यासाठी निघालेले आहेत. अशा परिस्थितीत मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करणे चुकीचे आहे आणि मागणी काय तर तीच जुनी त्यांची मागणी आहे. मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण दिले जाणार नाही, ही बाब सरकारने स्पष्ट केली आहे. तरीही मनोज जरांगे त्यासाठी अट्टाहास चालवला आहे. हे चुकीचे आहे, असे डॉ. तायवाडे म्हणाले.