Maratha Agitation : जरांगे पलटले, म्हणे.. आता ज्यांची गॅझेटमध्ये नोंद आहे, त्यांना आरक्षण द्या !

Jarange’s U-turn demands quota only for gazette listed : मराठा समाजाच्या आंदोलनाची धार कमी झाली

Nagpur : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात पुन्हा आंदोलन सुरू करून अख्ख्या मुंबईला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळू शकत नाही, हे त्यांना सरकारकडून वारंवार सांगण्यात आले आणि त्यांनाही ही बाब चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तरीही ते जिद्दीला पेटले होते. पण हट्ट करून काही उपयोग होत नसल्याचे पाहून मनोज जरांगे यांनी आता यू टर्न घेतल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केला आहे.

सुरूवातीला सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी करणारे जरांगे आता ज्यांची गॅझेटमध्ये नोंद आहे, त्यांना आरक्षण देण्याची मागणी करत आहेत. मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनाची धार आता कमी झाली आहे. मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याला तेव्हाही आमचा विरोध होता आणि आजही तो कायम आहे. मात्र गॅझेटमध्ये नोंद असलेल्या, शैक्षणिक आणि महसूल दस्तावेजांवर नोंद असलेल्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याला आमचा विरोध नाही. त्यामुळे जरांगेंचे आंदोलन आता कमजोर पडत चालले आहे, असे डॉ. तायवाडे यांनी सांगितले.

Vikas Thakre : कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा !

छगन भुजबळ यांनी मुंबईत बैठक आयोजित केली. त्यांचे निमंत्रण आले. पण त्या बैठकीला जाणे शक्य होणार नाही, अशी कल्पना त्यांना फोन करून दिली. नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण सुरू आहे आणि येथील आंदोलन सोडून मुंबईच्या बैठकीला जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे तसे छगन भुजबळ यांना कळवले आहे. आमच्या मागण्यांवर सकारात्मक उत्तर मिळाले नाही, तर मुंबईला जाणारच आहो, असेही डॉ. बबनराव तायवाडे यांनी माध्यमांना सांगितले.