Maratha movement : आंदोलन जालन्यात कर, मुंबईत कर किंवा दिल्लीत कर…

Bhujbals reaction to Jaranges determination : त्याला कोण आडवतंय? जरांगेंच्या निर्धारावर भुजबळांची प्रतिक्रिया

Nashik : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या गणेशोत्सवात मुंबईत मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. 29 ऑगस्टला मुंबईत दाखल होणारच, कोणीही आडवं आलं तरी थांबणार नाही. मागण्या मान्य न झाल्यास मुंबई सोडणार नाही, असा ठाम निर्धार जरांगेंनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या भूमिकेवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

त्याला कोण आडवं येत आहे? आंदोलन जालन्यात कर, अंतरवाली सराटीत कर, मुंबईत कर किंवा दिल्लीत कर… पण आंदोलन नियमात कर. संविधानाचे अधिकार आहेत, उपोषण कर, भाषण कर, पण कोणती कुरघोडी करू नकोस, असे भुजबळ म्हणाले. मराठा समाजाला जेवढं आरक्षण देता आलं ते दिलं. आता आणखी काय हवं? इतर समाजात शिरकाव करणे कोणी सहन करणार नाही. ओबीसी समाजात कोणी हस्तक्षेप करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Sudhir Mungantiwar : ‘ आ. सुधीर मुनगंटीवार यांची ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ सन्मानासाठी निवड’

दरम्यान, सुरज चव्हाण यांच्या नियुक्तीवरून विचारले असता भुजबळ म्हणाले, माझ्यासमोर सुरज चव्हाण यांना सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी अनेक वर्ष पक्षासाठी काम केले आहे. चूक झाली, माफी मागितली. त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी दूर ठेवणे योग्य नाही.
ध्वजारोहण प्रकरणावरही भुजबळांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकारने गोंदियातील ध्वजारोहणाची जबाबदारी दिली असली तरी त्यांनी नाशिकमध्येच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात ध्वजारोहण केले. मी अनेक वर्ष नाशिकमध्येच ध्वजारोहण केले आहे. कुठेही करा, झेंडा एकच आहे, वंदन एकच आहे. झोपडपट्टीतही झेंडा लावला तरी आनंद तसाच असतो. त्यामुळे हा विषय इथेच थांबवूया, असे भुजबळांनी सांगितले.

_____