Maratha movement : मसुदा पहिल्याच बैठकीत जरांगेंकडून मान्य !

Fadnavis important role behind the scenes : फडणवीसांची पडद्यामागची महत्वाची भूमिका

Mumbai : मराठा आरक्षण आंदोलन अखेर मार्गी लागल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावरील उपोषण मागे घेतले. त्यांच्या प्रमुख आठ मागण्यांपैकी सहा मागण्या सरकारने मान्य केल्या असून, त्यातील काहींची तातडीने अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामध्ये हैदराबाद गॅझेटिअरसंदर्भात शासन निर्णय (जीआर) काढण्यात आला आहे. या सर्व प्रक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडद्यामागे महत्वाची भूमिका बजावली, असे बोलले जात आहे.

फडणवीस यांनी कायदेशीर सल्लामसलत घेत राज्याचे महाधिवक्ता आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या चार बैठकांचे नेतृत्व केले. प्रत्येक मागणीच्या अनुषंगाने जीआरचा मसुदा तयार करून तो मंत्रिमंडळ उपसमितीसमोर ठेवण्यात आला. मसुदा इतक्या बारकाईने तयार करण्यात आला की तो मनोज जरांगे पाटील यांना पहिल्याच बैठकीत मान्य करावा लागला आणि चर्चेच्या अनेक फेऱ्या घ्याव्या लागल्या नाहीत.

Maratha reservation : पुन्हा फसवणूक; हा जीआर नव्हे तर माहितीपत्रक !

 

आंदोलनाच्या काळात देवेंद्र फडणवीस वैयक्तिकरित्या टार्गेट झाले, मात्र त्यांनी संयम दाखवत संतुलित भूमिका निभावली. राज्यात गणेशोत्सवाचं महत्व लक्षात घेऊन त्यांनी मुंबई, पुणे आणि नागपूर येथील गणेश मंडळांना भेटी दिल्या.
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा मराठा आरक्षण देणारे, ते टिकवणारे आणि आज पुन्हा आंदोलन यशस्वीरीत्या मार्गी लावणारे म्हणून देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा उभी राहिल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे.

Manoj Jarange : जरांगेना नोटीस, आंदोलनाची परवानगी नाकारली !

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, “माझ्यावर कितीही टीका झाली तरी मी विचलित झालो नाही. समाजाला न्याय मिळावा हेच माझं ध्येय होतं. त्यासाठी असा निर्णय घ्यावा लागतो की ज्यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होणार नाही किंवा कोणालाही अन्याय झाल्याची भावना राहणार नाही.

Maratha movement : आम्ही मराठ्याची औलाद, मागे हटणार नाही !

 

मराठा, ओबीसी वा महाराष्ट्रातील कोणताही समाज असो, प्रत्येकासाठी काम करणं हे माझं कर्तव्य आहे. त्या कर्तव्यावेळी कधी शिव्या मिळतात, तर कधी फुलांचे हार मिळतात.”

____