Minister Radhakrishna Vikhe Patil clarified the governments Role : मंत्री राधाकृष्ण विखे यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
Ahilya Nagar : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू झाले असून लाखो आंदोलकांनी मुंबईत धडक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चेस सरकार तयार असल्याचे सांगितले.
“मनोज जरांगे पाटील हे मुंबईत पोहोचले आहेत. त्यांना न्यायालयानं एक दिवसाच्या आंदोलनास परवानगी दिली आहे. जरांगे पाटील सरकारसोबत चर्चेस तयार आहेत, आमची देखील तीच भूमिका आहे. आरक्षण हा प्रतिष्ठेचा प्रश्न आम्ही केला नाही. त्यांचं निवेदन आल्यावर सरकार त्यांच्याशी चर्चा करेल,” असे वक्तव्य विखे पाटील यांनी केले.
Maratha movement : मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात सर्वपक्षीयांचा सहभाग !
काँग्रेसवर टीका करताना त्यांनी म्हटलं की, “काँग्रेसच्या दुहेरी भूमिकेमुळे जनतेने त्यांना हद्दपार केले आहे. आता अस्तित्व टिकवण्यासाठी ते आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. पण काँग्रेसची खरी भूमिका काय आहे हे राहुल गांधींनी स्पष्ट केले पाहिजे. ते एका बाजूला ओबीसींच्या बाजूने बोलतात आणि दुसरीकडे त्यांच्या महाराष्ट्रातील नेते आंदोलकांना पाठिंबा देतात.”
सरकारची भूमिका ओबीसी आरक्षणाबाबत कायम असल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले. “ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, हीच सरकारची भूमिका आहे. आजही आणि उद्याही हीच भूमिका राहील. मात्र शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते यावर स्पष्टपणे बोलायला तयार नाहीत. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी,” असे आव्हानही त्यांनी दिले.
India is Hindu nation : भारत हा अखंड आणि हिंदू राष्ट्रच आहे !
मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले असताना सरकारच्या या भूमिकेमुळे पुढील काही घडामोडींना वेग येण्याची चिन्हे आहेत.








