Maratha movement : फडणवीसांनी अखेर चर्चेचं दार उघडलं !

OSD Rajendra Sable meets Manoj Jarange; but…: ओएसडी राजेंद्र साबळे मनोज जरांगे यांच्या भेटीला; पण…

Antarvalisarati : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांत कटू शब्दयुद्ध रंगले होते. मात्र आता परिस्थिती गंभीर होत असताना सरकारने वाटाघाटीचे पहिले पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून पुढाकार घेत आपल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना आंतरवली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीस पाठवले.

मंगळवारी सकाळी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे आंतरवलीत पोहोचले. त्यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली. ही भेट होण्यापूर्वीच, साबळे हे जरांगे यांना मोर्चाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती करतील, अशी चर्चा रंगली होती. कारण उद्यापासून राज्यात गणेशोत्सवाचा उत्सव सुरू होत असून, याच काळात मुंबईत मराठा मोर्चा दाखल झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

Sanjay Sawkare : पालकमंत्रीपद सोडण्यासाठी संजय सावकारेंवर दबाव !

 

मात्र भेटीनंतर ओएसडी राजेंद्र साबळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “मी फक्त मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मोर्चाचा मार्ग काय आहे, त्यांना काय अडचणी आहेत, हे जाणून घेण्यासाठी आलो होतो. यापलीकडे काहीही बोलणार नाही.”

Sharad Pawar NCP : दोन ठिकाणी मतदार नाव नोंदणी? राष्ट्रवादी शरद पवार गटाची कारवाईची मागणी!

या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनीही माध्यमांशी संवाद साधला. मात्र त्यांनी स्पष्ट केलं की, “आमची आणि मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींची काही चर्चा झालेली नाही. आम्हाला एक तरी रस्ता द्या. हजार रस्ते आहेत, त्यापैकी एक द्या. पण मोर्चा पुढे ढकलायचा प्रश्नच नाही. मी आंदोलनावर ठाम आहे. मराठा आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे. माझ्या लेकराबाळांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. तीन महिन्यांचा वेळ द्यायचा म्हणाले होते, पण आजपर्यंत काहीच झालं नाही. त्यामुळे उद्या सकाळी 10 वाजता महाराष्ट्रातील मराठा समाज शांततेत मुंबईकडे निघणार आहे.”
सरकारकडून संवादाचा प्रयत्न सुरू झाला असला तरी मनोज जरांगे यांच्या ठाम भूमिकेमुळे मोर्चा रोखता येईल की नाही, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

____