Maratha movement : “उदयनराजे जरांगेंच्या मंडपात बसलं पाहिजे; पण हे भाजपचे हस्तक

Sanjay Rauts attack on the government and the royal family : संजय राऊतांची सरकार, राजघराण्यावर टीकेची झोड

Mumbai : मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी पोहोचले असून राज्यभरातून मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. या आंदोलनाला वेगळं वळण मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केवळ सरकारवरच नव्हे तर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे.

“उदयनराजे व शिवेंद्रराजे यांनी जरांगे पाटलांच्या मंडपात उपोषणाला बसलं पाहिजे. पण ते भाजपचे हस्तक आहेत, दबावाखाली आहेत. हे या राज्याचं दुर्दैव आहे,” अशी बोचरी टीका राऊत यांनी केली. दरम्यान, मुंबईत आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावरही त्यांनी थेट निशाणा साधला. “देशाचे गृहमंत्री आझाद मैदानावर येऊन आंदोलकांना भेटतील, तोडगा काढतील, अशी अपेक्षा होती. जे गृहमंत्री 370 कलम हटवू शकतात, घटनेत बदल करू शकतात, ते मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी घटनेत बदल का करू शकत नाहीत?” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

Maratha movement : जरांगेंनी आदेश द्यावा; एका तासात मुंबई बंद करू !

 

राऊत म्हणाले की, “अमित शाह मुंबईत आले, पण आंदोलकांकडे लक्ष न देता त्यांनी भाजपच्या नेत्यांना एवढंच सांगितलं की, मुंबईचा महापौर भाजपचाच व्हायला पाहिजे. म्हणजे उपरा व्हावा, बाहेरचा व्हावा. लालबागच्या राजाकडे प्रार्थना करून ते मुंबई मराठी माणसाच्या हातून काढून घेऊ इच्छित आहेत.”  संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही हल्ला चढवला. “फडणवीस कसले मराठी? जे मराठी माणसाच्या प्रश्नांकडे डोळेझाक करतात, ते मराठी नाहीत. अमित शाह आणि फडणवीसांचं सरकार मराठी माणसाला संपवण्यासाठी आलं आहे. हे बोलतात एक आणि करतात दुसरं,” असा आरोप त्यांनी केला.
“आझाद मैदानावर हजारो मराठा बांधव पावसात उपोषण करत आहेत. त्यांच्याकडे लक्ष देण्याचा वेळ गृहमंत्र्यांना नव्हता. पण भाजपचा महापौर मुंबईला हवा, एवढंच त्यांचं राजकारण आहे. हे अत्यंत क्रूर आहे,” अशी टीका राऊत यांनी केली.

Ashok nete: सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राची मान उंचावली !

राऊत पुढे म्हणाले की, “मराठा बांधव हजारोंच्या संख्येने मुंबईत जमले आहेत. त्यांचे स्वागत आहे. उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना आवाहन केले आहे की, आंदोलकांना सुविधा, अन्न, पाणी, निवारा पुरवण्यासाठी मदत करा. ही मुंबई मराठी माणसाची आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे. आंदोलकांनी मुंबईत थांबायला हवे.”

“उदयनराजे, शिवेंद्रराजे हे छत्रपतींच्या वारशाचे असल्याचा दावा करतात. मग त्यांनी जरांगे पाटलांच्या मंडपात बसून समाजासाठी लढा दिला पाहिजे. पण ते भाजपच्या दबावाखाली असून, भाजपचे हस्तक म्हणून काम करत आहेत,” अशी धारदार टीका करत राऊत यांनी या संपूर्ण आंदोलनाला नवं राजकीय परिमाण दिलं आहे.

_____