Sharad Pawar, Uddhav Thackeray, Ajit Pawar group publicly support Jarange : शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार गटाचा जरांगेंना जाहीर पाठिंबा
Mumbai : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेला महामोर्चा मुंबईत दाखल झाला. या आंदोलनाला राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक आमदार, खासदारांनी थेट पाठींबा दर्शवला आहे. शरद पवार गट, अजित पवार गट, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते मनोज जरांगेंच्या सोबत उभे ठाकले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मधून उत्तमराव जानकर (आमदार, माळशिरस), बजरंग सोनवणे (खासदार, बीड लोकसभा), संदीप क्षीरसागर (आमदार, बीड) यांनी पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधून विजयसिंह पंडित (आमदार, गेवराई), प्रकाश सोळंके (आमदार, माजलगाव), राजेश विटेकर (आमदार, पाथरी), राजू नवघरे (आमदार, वसमत) यांनी साथ दिली आहे.
India is Hindu nation : भारत हा अखंड आणि हिंदू राष्ट्रच आहे !
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) मधून ओमराजे निंबाळकर (खासदार, धाराशिव), कैलास पाटील (आमदार, धाराशिव-कळंब), संजय ऊर्फ बंडू जाधव (खासदार, परभणी) यांनी पाठींबा दर्शवला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. बाबासाहेब देशमुख (आमदार, सांगोला) यांनीही जरांगेंच्या आंदोलनाला साथ दिली आहे.
Maratha movement : प्रचंड प्रतिसादात मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले !
मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याची अंमलबजावणी, हैदराबाद गझेटियर लागू करणे, सगे सोयरे अध्यादेशाची स्पष्टता, आंदोलनादरम्यान झालेल्या गुन्ह्यांची मागे घेणे आणि कायद्याला धरून मराठ्यांना आरक्षण देणे यांचा समावेश आहे. या सर्वपक्षीय पाठिंब्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणातील केंद्रस्थानी आला आहे.