Maratha Movement : मराठा आरक्षण आंदोलनाआधी सरकारचा मोठा निर्णय !

Vikhe Patil takes charge of reorganization of Maratha sub committee before Jaranges agitation : जरांगेंच्या आंदोलनापूर्वी मराठा उपसमितीचे पुनर्गठन विखे पाटलांकडे सूत्र

 

Mumbai ; मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलन उभारणार आहेत. लाखो मराठा बांधव यात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, या आंदोलनापूर्वीच सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मराठा उपसमितीचं पुनर्गठन करून नवीन अध्यक्षपद राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.
यापूर्वी या समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील होते. आता ते या समितीचे सदस्य असणार आहेत. नव्याने स्थापन झालेल्या या समितीत एकूण 12 सदस्यांचा समावेश आहे. यात गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, कोकाटे, मकरंद जाधव आणि बाबासाहेब पाटील यांचा समावेश आहे.

Mahayuti meeting : महायुतीच्या रणनीतीसाठी वर्षा बंगल्यावर गुप्त बैठक

सरकारच्या या निर्णयामुळे आंदोलनापूर्वीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ही समिती मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्थितीचा आढावा घेणार असून, पुढील धोरणनिर्मितीसाठी आपले अहवाल सादर करणार आहे.     मनोज जरांगे यांनी आधीच्या आंदोलकांपेक्षा हे आंदोलन पाचपट मोठं असणार असल्याचा इशारा दिला आहे. 28 ऑगस्टपासूनच मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. सरकारनं घेतलेल्या या निर्णयाला आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्व प्राप्त झालं आहे.

_____