OBC Reservation Committee’s agitation in Jalgaon : जळगाव जामोदमध्ये ओबीसी आरक्षण बचाव समितीचे धरणे; मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन
Jalgao Jamod मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, कारण तसे झाल्यास हा थेट ओबीसी समाजावर अन्याय ठरेल, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ओबीसी आरक्षण बचाव समितीतर्फे ३ सप्टेंबर रोजी उपविभागीय कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर समितीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांना निवेदन पाठविण्यात आले.
मनोज जरांगे यांनी मुंबईत सुरू केलेल्या उपोषण आंदोलनातून “मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्यावे” ही मागणी केली आहे. मात्र, उच्च न्यायालय आणि विविध समित्यांनी आतापर्यंत मराठा आणि कुणबी वेगळे असल्याचे स्पष्ट निर्णय दिले आहेत. तसेच राज्य सरकारने आधीच मराठ्यांना एसईबीसी व ईडब्ल्यूएस मधून स्वतंत्र आरक्षण दिलेले आहे.
ओबीसी नेत्यांचे म्हणणे आहे की, “सरकार मराठा आंदोलकांच्या दबावाखाली काम करत आहे. फडणवीस सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेला शासन निर्णय हा अन्यायकारक असून, त्याद्वारे हैद्राबाद गॅझेटिअरचा आधार घेऊन मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.”
Local Body Elections : प्रभाग रचनेच्या हरकतींवरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने!
समितीने स्पष्ट केले की, “हा निर्णय रद्द न झाल्यास राज्यभर ओबीसी समाज आक्रमक आंदोलन छेडेल.” त्यांचे म्हणणे आहे की आधीच ओबीसींची संख्या आरक्षणाच्या प्रमाणापेक्षा अधिक आहे. त्यात पुन्हा मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिल्यास खऱ्या ओबीसी समाजावर तो सरळ अन्याय ठरेल.
Shashikant Khedkar : घरकुलांच्या प्रश्नावर शिंदे सेनेचा पंचायत समितीवर मोर्चा
धरणे आंदोलनात समितीचे अध्यक्ष ओ. पी. तायडे, रघुनाथ कौलकार, वाल्मीकराव ठाकरे, राम वानखडे, अविनाश उमरकर, सुभाष गवळी, प्रभाकर भुमरे, अर्जुन घोलप, ज्योतीताई ढोकणे, डॉ. सतीश शिरेकर, डॉ. संदीप वाकेकर, शेख अन्सार बाबू, संजय इंगळे, नंदकिशोर सातव यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.