On the tone of the Jarange government Maratha coordinators allege : जरांगे सरकारच्या तालावर… मराठा समन्वयकांचा आरोप
Jalna : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावरच आता गंभीर आरोप होत आहेत. मराठा समन्वयक आणि आरक्षणाचे अभ्यासक डॉ. संजय लाखे पाटील यांनी जरांगे यांच्यावर सडकून टीका करत त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “मराठा आरक्षण हा जगन्नाथाचा रथ आहे, पण जरांगे यांना वाटतं की हा रथ मी एकटाच ओढतोय,” अशा शब्दांत त्यांनी जरांगे यांचा समाचार घेतला.
लाखे पाटील म्हणाले, “जरांगे स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी आंदोलन करतात. ते संपूर्ण मराठा समाजाचे नव्हे तर केवळ कुणबी समाजाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या मागण्या वैध, कायदेशीर किंवा घटनात्मक आधारावर टिकणाऱ्या नाहीत. कायदा आणि शासन आदेश यातला फरकसुद्धा त्यांना कळत नाही. समाजाने जरांगेंवर फुलांवर कोट्यवधी खर्च केला, पण चुकीच्या पद्धतीने आंदोलन करून फक्त मराठा समाजाचे नुकसान झाले.”
Dashara melava : दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याची चर्चा
सरकारसोबत जरांगे यांच्या गुप्त समझोत्याचा आरोप करत लाखे पाटील पुढे म्हणाले, “मुंबई आंदोलनादरम्यान शासनाने दिलेला ड्राफ्ट जरांगेंना आधीच माहीत होता. नंतर गुलाल उधळून सरकारचा जयजयकार करण्यात आला. आधीच सरकारसोबत ड्राफ्ट तयार करून नंतर अभ्यासकांना बोलावून चर्चा करण्याचे नाटक करण्यात आले. हे सर्व समाजाची दिशाभूल करण्यासाठी केले गेले.”
डॉ. लाखे पाटील यांनी संघा वरही थेट आरोप केला. “जरांगेंचं आंदोलन उभं राहिलं नाही तर त्यांना सपोर्ट मिळणार नाही. अन्यथा देवेंद्र फडणवीस तीन महिनेही मुख्यमंत्री राहू शकत नाहीत. संघाच्या अजेंड्यानुसार जरांगे मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळं पाडण्याचं काम करत आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
Medical College : मुलांचे बालपण वाचवण्यासाठी साथ द्या, डॉ. अविनाश गावंडे यांचे आवाहन !
यावेळी लाखे पाटील यांनी मराठा समाजातील घटनात्मक आवाज दाबले जात असल्याचेही सांगितले. “जरांगे मुद्दामच अभ्यासकांना टार्गेट करतात. त्यांचं नेतृत्व समाजाला योग्य दिशेनं न्यायचं काम करत नाही. या चुकीच्या आंदोलन पद्धतीमुळे मराठा समाज फसवला जातोय,” असे ते म्हणाले.
मनोज जरांगे यांच्याविरोधात आलेल्या या आरोपांमुळे मराठा आंदोलनाच्या नेतृत्वाबाबत नवी चर्चा पेटली आहे. सरकारसोबत त्यांचा आधीच डील होता का, हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे.
____








