टाटा टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने होणार सुरूवात :Ajit Dada‘s Promice; Two ‘CtripleIT’s’ given in one and a half months
Mumbai : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाटा टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने मराठवाड्यातील बीड येथे सीट्रीपलआयटी मंजूर केली होती. त्यानंतर नांदेड दौऱ्यावर असताना त्यांनी नांदेड आणि छत्रपती संभाजी नगर येथे दोन सीट्रीपलआयटी देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर दीडच महिन्यात हे दोन्ही सीट्रीपलायटी मंजूर झाले आहेत. दादांनी केलेला वादा लवकरच पूर्ण केला, असा प्रतिक्रिया दोन्ही मराठवाड्यात उमटत आहेत.
मराठवाड्यातील युवकांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण आणि उद्योग क्षेत्राला कुशल मनुष्यबळ स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. मराठवाड्यात नवउद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या उद्दीष्टाची पूर्वी या निमित्ताने होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. मराठवाड्यातील कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यात ते सातत्याने दौरे करत आहेत. मराठवाड्यात तीन सीट्रीपलआयटी होणार असल्याने युवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Ajit Pawar : अजित पवार म्हणाले, केंद्राचा निधी यायचा असेल तर राज्याचा वापरा, पण…
सीट्रिपलआयटीच्या स्थापनेनंतर पहिल्या तीन वर्षांसाठी प्रशिक्षण खर्च टाटा टेक्नॉलॉजी उचलणार आहे. त्यानंतर प्रशिक्षणाचा खर्च टाटा टेक्नॉलॉजी आणि जिल्हा प्रशासन दरवर्षी प्रत्येकी अर्धा अधा विभागून करणार आहेत. नांदेड, छत्रपती संभाजी नगर आणि बिड जिल्ह्यासह हजारो युवकांना उद्योग क्षेत्राच्या गरजेप्रमाणे औद्योगित व तांत्रिक प्रशिक्षण मिळणार आहे. कौशल्यात वाढ होऊन उद्योगांना प्रशिक्षीत मनुष्यबळ मिळणार आहे.
२५ मार्च रोजी अजित पवार यांनी टाटा टेक्नॉलॉजीला पत्र लिहिले होते. मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमध्ये सीट्रिपलआयटी उभारण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली होती. कंपनीने दिडच महिन्यात तिन्ही जिल्ह्यांसाठी सीट्रिपलआयटी उभारण्यासाठी सहकार्य करण्यास मंजुरी दिल्याचे पत्र पाठवले आहे. आता मराठवाड्यातील युवकांना एआय वापरासह तांत्रिक कोशल्यविकासाटी संधी मिळणार आहे.