Women self-help groups should do branding of products : महिला व बालविकास अधिकाऱ्यांचे आवाहन
Akola महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी स्वतंत्र बाजारपेठ विकसित होणे आवश्यक आहे. गटांनी लोणची, पापड, मसाला आदी उत्पादनांपुरते मर्यादित न राहता बाजारपेठेचा वेध घेऊन नवनवी उत्पादने आणावीत. उत्पादनांच्या ब्रँडींगसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी बचत गटांना केले.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मलकापूर येथील स्व. लोभाजी आप्पा गवळी मंगल भवनात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे, बाल संरक्षण अधिकारी राजू लाडूलकर आदी उपस्थित होते.
Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्र्यांचा Effect! शंभर वर्षांमध्ये प्रथमच होतेय हे काम!
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी दमदार वाटचाल करत आहे. ५० वर्षापूर्वींच्या या रोपट्याचा आता महावृक्ष झाला आहे. त्यामागे खेड्यापाड्यातील महिलाभगिंनीचे परिश्रम आहेत, असे प्रतिपादन गिरीश पुसदकर यांनी म्हटले. वन स्टॉप सेंटरच्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन यावेळी झाले. यावेळी बचत गटांमुळे परिवर्तनाबाबत रशिदा बी शेख व शोभा लाहोडे यांनी अनुभवकथन केले. श्रीमती खोब्रागडे यांनी प्रास्ताविक केले.
Akola Zilla Parishad : जिल्हा परिषदेत अधिकार्यांचे ‘प्रभारनाट्य’ !
नागपूर जिल्ह्यातक्रमही कार्य महिला आर्थिक विकास महामंडळाने नागपूर जिल्ह्यात नागपूर (ग्रा.), नागपूर (श.), मौदा, कुही, भिवापूर, हिंगणा, काटोल व रामटेक या आठ तालुक्यात महिलांचे लोक संचालित साधन केंद्र स्थापन केले. ग्रामीण व शहरी भागात एकूण 4843 स्वयंसहाय्यता महिला बचत गट तयार केले आहेत. याद्वारे 56 हजार 950 महिलांचे संघटन व सक्षमीकरणाचे काम केलेले आहे. माविमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महिलांच्या आरोग्यासाठी सकस आहाराबाबत जनजागृती, आरोग्य तपासणी, तिरंगा थाळी स्पर्धा, स्त्री पुरुष संयुक्त मालकी अभियान, अॅनिमिया मुक्त गाव अभियान व गटातील महिलांनी उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.