Medical College : मुलांचे बालपण वाचवण्यासाठी साथ द्या, डॉ. अविनाश गावंडे यांचे आवाहन !

Dr. Avinash Gawande Urges Public to Safeguard Childhood : घरोघरी ‘शू रॅक’ प्रमाणे ‘मोबाईल रॅक’ लावणे गरजेचे, मोठ्या समस्येकडे वेधले लक्ष

Nagpur : घरोघरी लहान वयातील मुले मोबाईल फोन सारखे डिव्हाईस हमखास हाताळताना दिसतात. त्यामुळे त्यांचा बौद्धिक विकास होत नाही. परिणामी ते चांगले नागरिक म्हणूनही घडू शकत नाहीत. नागपूर शहरात भविष्यातील शिस्तप्रिय नागरिक घडवण्यासाठी न्यू हेल्थ सिटी मदर अॅन्ड चाईल्ड रुग्णालयातर्फे ‘बी-सिवीक’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती सुप्रिसिद्ध बालरोग तज्र्ज्ञ आणि नागपूर मेडिकल कॉलेचजे वैद्यकिय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली.

यासंदर्भात पत्रकार परिषदेत डॉ. गावंडे यांनी सांगितले की, मुलांवर अगदी लहान वयापासून संस्कार होणे गरजेचे असते. त्यासाठी पालकांनी घरात ‘शू रॅक’ प्रमाणे ‘मोबाईल रॅक’ लावणे गरजेचे आहे. जेणेकरून वापर करून झाल्यावर पालक आपला मोबाईल फोन मोबाईल रॅकमध्ये ठेवतील. हे बघून घरातील लहाम मुलेही पालकांचे अनुकरण करतील. यासोबत प्रत्येक घरात नो मोबाईल रूम तयार करणेही आवश्यक झाले आहे. याचा मुलांच्या मनावर सखोल परिणाम होईल. या खोलीत पालक मोबाईल वापरत नाहीत, हे मुले बघतील. यामुळे मोबाईलच्या अतिरेकी वापराच्या सवईपासून बालकांची आपोआप सुटका होईल. पत्रकार परिषदेला डॉ. संजय पाखमोडे, डॉ. योगेश टेंभेकर उपस्थित होते.

Vidarbha Farmers : चार फूट खोल पाण्यातून रोज शेतात जातात शेतकरी!

वरील उपक्रमासोबतच वाहतुकीचे नियम पाळणे, आजुबाजूच्या परिसरात स्वच्छता ठेवणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, झाडे लावणे, सार्वजनिक उद्याने, मैदाने यांचा योग्य सन्मान करणे. ओला कचरा, सुका कचरा विषयी जनजागृती यांसारखे जनजागृतीपर उपक्रम नागपुरातील शाळा, महाविद्यालये, मॉल, सिनेमा, रेल्वे स्टेशन, विमानतळ, बसस्थानक, मेट्रो स्थानक, मंदिरे आदी ठिकाणीही राबवले जाणार आहे, असे डॉ. पाखमोडे यांनी सांगितले.

Adivasi Pardhi Community : आदिवासी पारधी महिलेने केला सामूहिक अत्याचार झाल्याचा आरोप !

नागपूर महानगरपालिकेसोबत मिळून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. पोलिस आयुक्तांसोबत ‘मुक्ती’ अभियान राबवत आहोत. यामध्ये शहरातील भिक्षेकऱ्यांना मेडिकलमध्ये आधी उपचारासाठी आणले जाते. तेथे त्यांच्यावर निःशुल्क उपचार केले जातात. हा उपक्रम आम्ही जिल्हाधिकारी, महानगरपालिका प्रशासन तसेच पोलिस प्रशासनाचेया सहाय्याने राबवत असल्याचे डॉ. टेंभेकर यांनी यावेळी सांगितले.