Breaking

Meeting of MPs : संसदेत जनतेच्या प्रश्नांवर ठाम, आक्रमक भूमिका घ्या !

Uddhav Thackerays orders to MPs in Delhi : उद्धव ठाकरेंचा दिल्लीत खासदारांना आदेश

New Delhi : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा व राज्यसभेतील सर्व खासदार उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी खासदारांना स्पष्टपणे सांगितले की, “शिवसेनेचा जन्मच जनहितासाठी लढण्यासाठी झाला आहे. संसदेमध्ये जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घ्या. सरकारला सळो की पळो करून सोडा.”

त्यांनी केंद्र सरकारवर आरोप करत म्हटले की, “मोदी सरकारचा एकमेव अजेंडा सत्ता आहे, त्यांना जनहिताशी काहीही देणंघेणं नाही. ”या बैठकीला युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, बंडू जाधव, राजाभाऊ वाजे, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर आणि प्रियांका चतुर्वेदी हे उपस्थित होते. या बैठकीदरम्यान खासदारांनी आपापल्या अडचणी आणि क्षेत्रातील प्रश्न मांडले, त्यावरही उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली.

Local body Election : मतदार यादीत अनियमितता, ईव्हीएमबाबत शंका !

दरम्यान, 7 ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून त्यापूर्वी उद्धव ठाकरे व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात दूरध्वनीवरून संवाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या संवादात आगामी बैठकीतील मुद्द्यांवर आणि रणनीतीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे.

cabinet reshuffle : वादग्रस्त वक्तव्य टाळून कामगिरीत सुधारणा करण्याची ताकीद !

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येत असताना विरोधी पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यामुळे आगामी काळात राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.