Anti-encroachment campaign speed-up : व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ, पर्यायी जागेची मागणी
Buldhana मेहकर शहरातील सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण हटवण्यासाठी नगरपालिकेने २ एप्रिलपासून सुरू केलेल्या मोहिमेची व्याप्ती १५ एप्रिलपासून पुन्हा वाढवण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी पालिकेच्या जेसीबीने पोलिस स्टेशन परिसरात पक्क्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू करताच व्यापाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
काही व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली, तर काहींनी मुदत मागितली. मोहिमेदरम्यान तणाव निर्माण झाल्याने काही वेळेसाठी कारवाई स्थगित करण्यात आली होती. मात्र, दुपारी बसस्थानक परिसरातील सोनाटी रोडवरील अतिक्रमण हटवण्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आणि ते सायंकाळपर्यंत सुरू राहिले.
या मोहिमेत मुख्याधिकारी रामराजे कापरे, तहसीलदार नीलेश मडके, ठाणेदार व्यंकटेश आलेवार यांच्यासह नगरपालिका कर्मचारी आणि पोलिस बंदोबस्त उपस्थित होता.
Minister Girish Mahajan : मंत्र्याचे नाव सांगत २८ लाखांनी लुटले!
शहरातील काही रस्ते अनुक्रमे १२ मीटर व ९ मीटर रुंद असून, काही ठिकाणी खासगी मालकीचे प्लॉट्स आहेत. पालिकेचा उद्देश ३ मीटरपर्यंतचे अतिक्रमण हटवून शहराचा नियोजनबद्ध विकास करणे आहे. यावरून पालिकेची अडचणी न पत्करणारी ठाम भूमिका स्पष्ट होते.
Amravati born personalities : अमरावतीतील ‘काँग्रेस नगर’ दिग्गजांची खाण!
व्यापाऱ्यांचा विरोध, पर्यायी जागेची मागणी
या कारवाईविरोधात व्यापाऱ्यांनी ९ एप्रिल रोजी दुकाने बंद ठेवून पालिकेला निवेदन दिले होते. पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, प्रशासनाने फारसा प्रतिसाद दिला नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. उलट, अतिक्रमणविरोधी मोहिमेची व्याप्ती आणखी वाढवण्यात आली आहे.