Breaking

MIDC Amravati : उद्योजकांच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली!

Officer transferred after receiving order from the ministry : मंत्रालयातून आदेश आला, एमआयडीसीचे वादग्रस्त अधिकारी प्रशांत पडळकर कार्यमुक्त

Amravati औद्योगिक विकास महामंडळ MIDC चे अमरावती येथील प्रादेशिक अधिकारी प्रशांत पडळकर यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले आहे. विभागातील उद्योजकांच्या तक्रारींची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे.

प्रशांत पडळकर यांच्या कार्यशैलीमुळे केवळ अमरावतीच नव्हे, तर संपूर्ण विभागातील उद्योजक त्रस्त झाले होते. किरकोळ कामांसाठीही अनावश्यक अडथळे उभे करून आर्थिक फायद्यासाठी उद्योजकांना प्रतीक्षेत ठेवले जात होते. त्यामुळे उद्योग सांभाळायचे की अधिकाऱ्यांच्या मनधरणीला वेळ द्यायचा. अशा द्विधा मनस्थितीत उद्योजक सापडले होते. एमआयडीसीच्या कारभाराबाबत उद्योजक संघटनांनी थेट मंत्रालयाकडे तक्रारी केल्या होत्या.

Mahayuti Government : रहिवासी दाखले देणारेच दुसऱ्या गावचे रहिवासी!

मंत्रालयातील अधिकाऱ्यांनीही पडळकर यांना कारभार सुधारण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्या सूचनांकडे दुर्लक्ष करत त्यांनी आपली कार्यशैली सुरूच ठेवली. दोन महिन्यांपूर्वी एमआयडीसीच्या अमरावती विभागीय कार्यालयात लाचलुचपत विभागाने एका कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते. या प्रकरणातून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे स्पष्ट झाले होते.

एमआयडीसीच्या महाव्यवस्थापकांनी १३ मार्च रोजी आदेश जारी करत प्रशांत पडळकर यांचे मुंबई येथील भूसंपादन विभागाच्या मुख्यालयात बदली आदेश दिले. अमरावती प्रादेशिक कार्यालयाचा पदभार स्नेहा टी. नंद यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अकोला येथील प्रादेशिक अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार डी. एस. इंगळे यांच्याकडे देण्यात आला आहे.

National Food Security Scheme : रेशन कार्ड आहे? मग e-KYC करा, अन्यथा…

पडळकर यांना केवळ कार्यमुक्त करून हा विषय संपणार नाही, तर त्यांच्या कार्यकाळातील अनियमिततेची चौकशी होऊन उद्योजकांच्या अडवलेल्या फाईल्सची तपासणी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.